पेठशिवणी येथे सेवानिवृत्त सैनिक संतोष सोनवळे यांचा सत्कार समारंभ संपन्न
पेठशिवणी प्रतिनिधी गोपीनाथ शिनगारे
लष्करातील 20 वर्षे भारत मातेची सेवा पूर्ण करुन पेठशिवणीचे जावाई संतोष नारायण सोनवळे (भूमिपुत्र देऊळगाव माळ्याचे) हे पेठशिवणी येथे आले असता त्यांचा भव्यदिव्य सत्कार गावकर्यांनी केला.भारतीय सैन्य दलात विविध संकटांना सामोरे जात देशाचे रक्षण करणारे जवान भारतमातेचे भूषण असतात.अशा सैनिकांचा सत्कार करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे असे येथील नवयुवकांनी ठरवले आणि त्यांचा फौजी सेनसेवा इंटरप्राईजेस येथे शाल,श्रीफळ व हार देऊन सत्कार करण्यात आला.स्वागताने सोनवळे हे ही भारावून गेले.'मातृभूमीची सेवा करून परतलो आहे.नोकरीची सेवापूर्ती झाली असली तरी देशसेवा अंतिम श्वासापर्यंत सुरूच राहील,'अशी प्रतिक्रिया संतोष सोनवळे यांनी व्यक्त केली.या वेळी माजी सैनिक शिवसांब हंगरगे,गोपीनाथ शिनगारे(सरकार),मारोतराव शिंदे, माधव शेटे,बालाजी शिनगारे,बालाजी डोके,विजय शिनगारे,प्रदिप डोळस,दत्ता डोके,गणेश शेटे,प्रभाकर गोरे,विशाल शिनगारे,कैलास शेटे, उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपीनाथ शिनगारे सर यांनी केले.

0 टिप्पण्या