राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने दांडी बहादर कामचुकार डॉक्टर नीलकंठ सगर यांना तात्काळ निलंबित करा असी मागणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या कडे निवेदना द्वारे करण्यात आले.

 राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने दांडी  बहादर कामचुकार डॉक्टर नीलकंठ सगर यांना तात्काळ निलंबित करा असी मागणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या कडे निवेदना द्वारे करण्यात आले.

देवणी प्रतिनिधी

कामचुकार दांडी बहादर देवणी येथील ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर निळकंठ सगर यांना तात्काळ बडतर्फ करावे अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने व देवणी शहर व तालुक्याच्या वासीयांच्या वतीने माननीय आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेब यांच्याकडे देवणी तहसिलदारामार्फत निवेदनाद्वारे म्हटले आहे

 डॉक्टर नीळकंठ सगर यांच्या नियुक्तीपासून होत असलेल्या गैर कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करावी नेमणूक झाल्यापासून आठवडा किंवा पंधरा दिवसांत एकदा सुद्धा हजेरी लावून कर्मचाऱ्यांवर दबाव आणून दंडेलशाही पणे वर्तणूक करणाऱ्या या अधिकाऱ्यावर सर्व कनिष्ठ कर्मचारी नाराज आहेत उर्मट स्वभाव व अरेरावीची भाषा वापरत दहशतीने कारभार करणाऱ्या या  अधिकारी यांनी अनेक कर्मचारी सहा महिन्याच्या पगारी रोखून ठेवले आहेत 

पगार रोखून ठेवलेले डॉक्टर आनंद आष्टुरे डॉक्टर आरती भंगे ,शुभागी अंकुलगे स्टॉप नर्स शिंगाडे लॅब असिस्टंट या असे अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहेत तसेच देवणी तालुक्यातील कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया मध्ये डॉक्टर निळकंठ सगर चुकीचे शस्त्रक्रिया करून जवळपास चार जणांना परत गर्भधारणा झालेली आहे त्यांची नावे नंबर 1 पूजा सुनील राठोड नंबर 2 नूतन राजकुमार हुलसुरे व असे अजून दोन आणि अशा चार कुटुंबावर अन्याय झालेला आहे

 दांडीबहाद्दर डॉक्टर निळकंठ सगर दबावतंत्र वापरून अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामे सोपवून आपण स्वतः मात्र निलंगा येथील स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये खाजगी उपचार करून शासनाची दिशाभूल करत आहेत एकीकडे शासनाचे वेतन घेऊन अध्यक्षपद भूषवितात तरी दुसरीकडे कायद्याने बंदी असतानाही निलंगा येथे स्वतःचे खाजगी हॉस्पिटल चालतात याचा पुरावा म्हणजे त्यांच्या हॉस्पिटलच्या सीसी टीव्हीचे पुरावे त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करून संपत्तीची चौकशी करावी

अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे निवेदनाद्वारे या मगरूर अधिकाऱ्याच्या विरोधात आजवर अनेक निवेदने व आंदोलने झाल ग्रामीण रुग्णालयात ताला ठोको आंदोलन सुद्धा झाले आहे तरीही त्यांना मिळत असलेला राजकीय श्रेया मुळे त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही यामुळे वागण्यात सुधारणा होण्याऐवजी आणखी खानचा मुजोरपणा चालवला आहे रासप च्या वतीने आजवर पाच ते सहा निवेदन यांच्या विरोधात जिल्हाधिकारी तथा जिल्हा आरोग्य अधिकारी यांना यापूर्वी देऊन वेळोवेळी तक्रार दिली आहे

 यावर वरिष्ठांनी कोणतीच कारवाई केली नाही त्यामुळे आपण आज महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेब यांना गंभीरपणे दखल घेऊन लोकांनी त्यांच्या कारभाराची आपल्या पातळीवर चौकशी करून तात्काळ शासन करावे अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे यांच्यावर तात्काळ कारवाई नाही झाल्यास दिनांक 9/ 2 /2020 रोजी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या