रमाई घरकुलबां मोफत 5 ब्रास वाळू उपलब्ध करुन द्यावी गायकवाड
लोहा तालुका प्रतिनिधी बळीराम येवले पाटील
तालुक्यातील लाभार्थ्यांना रमाई आवास घरकुल योजना ,पंतप्रधान घरकुल योजने अंर्तगत घरकुल मंजुर झाले आहे.परंतु वाळुचे भाव गगनाला भिडले असल्याने गरीब लाभार्थ्यांना वाळु विकत घेणे अवघड झाले आहे.त्यामुळे लाभार्थ्यांना प्रत्येकी 5 ब्रास वाळु मोफत उपलब्ध करुन द्यावी
अशि मागणी आंबेडकर नॅशनल काॅंग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिलदादा गायकवाड यांनी जिल्हाधिका-यांकडे केली आहे.लोहा तालुक्यात रमाई आवास घरकुल, पंतप्रधान घरकुल मंजुर झाले आहेत.परंतु घरकुल बांधकाम करण्यासाठी लागणारे साहीत्य त्यामध्ये वाळु,गीट्टी,विट,गजाळी,सिमेंट,लागत आहे.सध्या बाजारात सर्वच वस्तुचे भाव गगनाला भिडले असल्याने लाभार्थ्यांना घरकुलाचे बांधकाम करणे कठीण झाले आहे.
लाभार्थ्यांंना मोफत 5 ब्रास वाळु शासन नियमा प्रमाणे प्रशासन का उपलब्ध करुन देत नाही.हा मोठा प्रश्न आहे.शासन निर्णयानुसार प्रत्येक लाभार्थ्याला 5 ब्रास वाळु उपलब्ध करुन द्यावी.कारेगाव येथील श्रीमती चऊत्राबाई व्यंकटी गायकवाड व संतोष व्यंकटी गायकवाड यांच्या सन.2018-2019 व 2019-2020 च्या मंजुर रमाई आवास घरकुल बांधकामासाठी शासन निर्णया प्रमाणे मोफत 5 ब्रास वाळु उपलब्ध करुन द्यावी
अशी निवेदनाव्दारे जिल्हाधिका-यांना मागणी केली होती तेंव्हा जिल्हाधिका-यांनी कंधार उपविभागिय अधिकारी यांना मोफत 5 ब्रास वाळु उपलब्ध करुन देण्यासबंधी उचित कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आंबेडकर नॅशनल काॅंग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष अनिलदादा गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांचे आभार मानले.

0 टिप्पण्या