तांदुळवाडी येथे केंद्रस्तरीय बालविवाह निर्मूलन प्रशिक्षण संपन्न
परांडा तालुका प्रतिनिधी विजय शेवाळे
परंडा:-आज दि 6जानेवारी जि. प. के. प्रा. शाळा तांदुळवाडी येथे 'बालविवाह निर्मूलन केंद्रस्तरीय प्रशिक्षण ' आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन तांदुळवाडी बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी निर्मळे साहेब, विषयतज्ज्ञ बाराते सर व केंद्रिय मुख्याध्यापक भोसले सर यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजामाता यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वांच्या वतीने "अनाथांची माता ' पद्मश्री स्व. सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर या वर्षीचे 'परंडा तालुका शिक्षक पुरस्कार ' प्राप्त महादेव गाडे सर यांना बाराते सर यांच्या व मनिषा कुलकर्णी मॅडम यांना शेवाळे मॅडम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
तसेच सुभाष देवकर सर यांना 'साने गुरुजी शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या नूतन संचालक ' पदी निवड झाल्याबद्दल तांदुळवाडी बीटचे शिक्षण विस्ताराधिकारी निर्मळे साहेब यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यानंतर निर्मळे साहेब यांनी बालविवाह निर्मूलन प्रशिक्षणाबाबत माहिती सांगितली. तसेच प्रशासनातील अनुभव सर्व शिक्षकांना सांगितलेसदर प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेले बाराते सर व भोसले सर यांनी पीपीटी द्वारे सदर प्रशिक्षणाची इतंभूत माहिती सर्व प्रशिक्षणार्थ्यांना दिली. यावेळी तांदुळवाडी केंद्रातील 50% नियमानुसार शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल गिरी सर यांनी केले तर आभार प्रदर्शन सुभाष देवकर सर यांनी मानले.

0 टिप्पण्या