आणदुर पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार राठोड सह पत्रकारांचा पुरस्काराने सन्मानित

 आणदुर पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार राठोड सह पत्रकारांचा पुरस्काराने सन्मानित

उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी प्रविण राठोड 

तुळजापूर तालुक्यातील आणदुर येथिल जय मल्हार पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिनानिमित्त जनतेचा बातमीदार न्यूज चैनल चे उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी प्रवीण राठोड सह ग्रामीण व शहरी पत्रकारांचा आदर्श पत्रकारीता पुरस्काराने सन्मान

 आणदुर जय मल्हार पत्रकार संघाचे 2022  दिनदर्शिका प्रकाशन सोहळा व ग्रामीण पत्रकार बांधवांचा राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते तर सरपंच रामचंद्र आलुरे ,श्री श्री रविशंकर शाळेचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र कानडे , शिवसेनेचे नेते बाळकृष्ण घोडके ,  सामाजिक कार्यकर्ते भगिरथ कुलकर्णी , जेष्ठ पत्रकार अजय अंदुरकर यांच्या प्रमुख उपस्थित जनतेची बातमीदार न्यूज चैनल चे उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी प्रवीण राठोड जिल्हा रॉयल मीडिया चे उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी सतीश राठोड सह ग्रामीण व शहरी पत्रकारांचा देखील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . 

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दर्पनकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले .  

 जय मल्हार पत्रकार संघ आणदूर यांच्यावतीने वर्षभर अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबविले  जातात . तर  कोरोनास हद्दपार करण्यासाठी कलापथकाच्या माध्यमातून  पत्रकार  संघाने गाव शहर वाड्या वस्तीत जाऊन प्रबोधन केली आहे . 

आगामी काळात येणा-या पिंगळा या मराठी चित्रपटात काम करण्यासाठी आणदुर येथील पत्रकार दयानंद काळुंके यांची निवड झाल्याबद्दल पत्रकार काळुंके यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान देखील करण्यात आला . दर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय मल्हार पत्रकार संघातील सर्व पत्रकारांनी परिश्रम घेतले


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या