कोरोना कडक निर्बंध जाहीर,उद्या मध्यरात्रीपासून नवीन निर्बंध लागू...

 कोरोना कडक निर्बंध जाहीर,उद्या मध्यरात्रीपासून नवीन निर्बंध लागू...


परंडा प्रतिनिधी-विजय शेवाळे


परंडा;-दि.8 कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्यात आज काही आवश्यक निर्बंध लावण्यात आले आहेत. 

👉उद्या मध्यरात्रीपासून राज्‍यात नवे नियम लागू

सकाळी 5 ते रात्री 11 राज्‍यात जमावबंदी लागू


👉रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत राज्‍यात नाईट कर्फ्यू


👉मैदाने उद्‍याने पर्यटन स्‍थळे बंद राहणार


👉रेस्‍टॉरंट, नाट्यगृहे, चित्रपटगृहे 50 टक्‍के क्षमतेने रात्री 10 पर्यंत सुरू राहणार


👉2डोस पूर्ण झालेल्‍यांनाच सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ घेता येणार


👉राज्‍यातील शाळा,कॉलेजेस, क्लासेस 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार


👉खासगी कंपन्यांमध्ये 2 डोस घेतलेल्‍यांनाच परवानगी


👉खासगी कार्यालये 50 टक्‍के क्षमतेने सुरू राहतील


👉लग्‍नासाठी 50लोकांनाच परवानगी.


👉हॉटेल रेस्टॉरंट फक्त रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा


👉अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांनाच परवानगी.

  राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी हे आदेश काढले असून त्याची तात्काळ अंमलबजावणी सुरु करण्यास सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या