महाराष्ट्रातील आदर्श लोकनेते मा.काॅ.जे.पी.गावित साहेब प्राध्यापक डाॅक्टर गोविंद पाटील.
झेलतो आता कित्येक रोज वार मी,झुंज वास्तवाशी मानली ना हार मी, भल्यासाठी घेतले संकल्प सारे मनी,जगत आलो आता क्षितीजा पार मी.
या काव्य पंक्ती प्रमाणे समग्र जीवन जगणारे आमुचे मार्गदर्शक व प्रेरणास्रोत, महाराष्ट्रातील खंबीर, लढवय्ये, झुंजार, लोकप्रिय नेते, तरूणांचे आधारस्तंभ, दुर्गम आदिवासी भागाचे शिक्षणमहर्षी, सुरगाणा-पेठ-कळवण परिसराचे विकासरत्न, जननायक, लोकनेते व आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ, अलंगुन या शिक्षण संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष तथा कळवण-सुरगाणा मतदार संघाचे, क्रांतीकारी नेते माननिय आमदार काॅम्रेड जे.पी.गावित साहेब, यांचा आज जन्मदिवस...!
आदरणीय काॅम्रेड गावित साहेब म्हणजे महाराष्ट्रातील ग्रामीण-आदिवासी जनतेचे कैवारीच! एका सर्वसामान्य परिवारात, अलंगुण तालुक्यात, सुरगाणा जिल्हा नाशिक येथे, १७ डिसेंबर १९४९ रोजी लक्ष्मीबाई व पांडूरंग गावित, या दाम्पत्याच्या पोटी जन्माला आले,
आदरणीय गावित साहेबांनी, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, स्वतःच्या अस्तित्वाच्या लढाई बरोबरच, समाजाच्या अस्तित्वाची अन् अस्मितेचेही लढाई लढुन.आपल्या या दुर्गम-अतिदुर्गम भागातील समाजाला, विकासाच्या मुख्य प्रवाहात आणाण्यासाठी, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षणापासून कोसो मैल दूर असलेल्या आदिवासी मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी १९८९ मध्ये आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ, नावांच्या इवलेसे रोपटे लावले,
आज त्याच रोपट्याचा महाकाय वटवृक्षात झाला आहे. सद्यस्थितीत या शिक्षण संस्थेच्या विविध शाखांमध्ये हजारो मुलं ज्ञानार्जन करत आहेत. या शिक्षण संस्थेची स्थापना करून कॉम्रेड गावित साहेब, या भागाचे खऱ्या अर्थाने, 'शिक्षणमहर्षी' अर्थात उद्धारकचं ठरले.
या शिक्षण संस्थेत शिकलेले अनेक विद्यार्थी, डाॅक्टर, इंजिनिअर, वकील, प्राध्यापक, शिक्षक, पोलिस, वनरक्षक, तलाठी, ग्रामसेवक इत्यादी शासकीय, निमशासकीय व खाजगी क्षेत्रातील, विविध पदांवर कार्य करत सन्मानाने जीवन जगत आहेत. परिसरातील अनेक विद्यार्थी MPSC, UPSC, SET, NET इत्यादी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, तर बरेच विद्यार्थी या परीक्षेच्या माध्यमातून निवड होऊन, विविध उच्च पदावर कार्यरत आहेत.
तसेच काहीजण छोटा-मोठा व्यवसाय अगदी उत्तमरित्या करत, स्वाभिमानाने जीवन जगत आहेत. हे केवळ साहेबांची शिक्षक्षणाविषयी असणा-या दूरदृष्टीनेच साध्य झाले आहे. कारण त्यांनी तत्कालीन कालखंडात हेरले होते की, मागासलेपणाचे मूळ कारण हे येथिल अज्ञान आणि अंधश्रद्धेत दडलेले आहे आणि त्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. याच उदात्त हेतूने व व्यापक विचारांने शिक्षण संस्थेची स्थापना करून दुर्लक्षीत, वंचित आदिवासी मुलांच्या उत्कर्षासाठी सुरगाणा, पेठ, त्र्यंबक, कळवण तालुका परिसराच्या कानाकोपऱ्यात शाळा स्थापन केल्या आणि शिक्षणाची दारे खुली करण्याचे पवित्र कार्य हाती घेतले.
म्हणूनच आज अनेक विद्यार्थी यशाचे उंच शिखर अगदी सहज पादाक्रांत करत आहेत. यामुळेच या परिसरातील तरुणांचे आदरणीय काॅ. गावित साहेब हे आदर्श तर आहेतच त्याचबरोबर आधारस्तंभही आहेत.
ग्रामीण-आदिवासी जनतेची मुलुख मैदानी बुलंद तोफ म्हणजे आदरणीय काॅ. गावित साहेब होत. येथिल समाजाला रचनात्मक कार्याची दिशा देऊन अन्याय, अत्याचाराला विरोध करण्यासाठी क्रांतीकारी विचारांची ऋजवण करत समाजपरिवर्तन घडवून आणले. म्हणून त्यांना क्रांतीकारी लोकनेते असे संबोधले जाते. १९७० च्या दशकात अतिदुर्गम आदिवासी भागातील जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पुढे आलेले गावित साहेब CPM पक्षाच्या माध्यमातून १९७८ मध्ये प्रथमतः विधानसभेत आमदार म्हणून दाखल झाले तर
आणि सतत आठ पंचवार्षिक योजना या परिसराचे नेतृत्व करत येथिल समाजाचे वनजमिन, राशन, वृध्दापकाळ, रोजगार, रस्ते, दळणवळण, इत्यादी अनेक प्रश्न सोडवले व आजही सोडविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. समाजासाठी समग्र आयुष्य अर्पण करणारे काॅ. गावित साहेब हे या परिसराचे ध्येयवादी, कृतीशील नेते वा विकासपुरुष आणि खरे दैवतच आहेत.
असे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कृतत्वाचा ठसा उमटवणारे आदरणीय काॅ.गावित साहेब हे येथिल तरूणांचे, समाजाचे व आम्हा शिक्षकांचे आदर्श, मार्गदर्शक व प्रेरणास्रोत आणि आधारस्तंभच आहेत. आज असे उत्तुंग व्यक्तिमत्व असणारे आदरणीय काॅ.जे.पी.गावित साहेब यांचा ७२ वा वाढदिवस आणि त्या औचित्यानेच केलेला हा लेखप्रपंच.....
आदरणीय साहेब, आपणास उदंड निरोगी आयुष्याच्या अनंत कोटी मंगलमय शुभेच्छा.....!!!
शुभेच्छुक :- गोविंद पाटील, चिंचलाता.सुरगाणा जि.नाशिक

0 टिप्पण्या