कडाक्याच्या थंडीत गोरगरिबांसाठी वैद्यकीय संस्थेच्या वतीने मायेची उब.

 कडाक्याच्या थंडीत गोरगरिबांसाठी वैद्यकीय संस्थेच्या वतीने मायेची उब. 

नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख मनोज बिरादार

गरिब-श्रीमंत असा भेद न करणारी थंडी साऱ्यांनाच जाणवते.संवेदनशील माणसे अशावेळी समाजातील उपेक्षितांसाठी पुढे येतात.असेच सामाजिक बांधिलकी जोपासत वैद्यकीय संस्थेच्या वतीने मुखेड शहरातील अनेक अनाथ, वंचित,तसेच उघड्यावर संसार थाटलेल्या गोरगरिबांना हुळहुळणाऱ्या थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. 


यावेळी,वैद्यकीय संस्थेचे डॉ. दिलीपराव पुंडे,डॉ. आशोक कौरवार,डॉ. व्यंकट सुभेदार (अध्यक्ष-आय.एम.ए.मुखेड),वैद्यकीय संस्थेचे सचिव डॉ. पांडुरंग श्रीरामे,डॉ. रामराव श्रीरामे,डॉ. महेश पत्तेवार,वैद्यकीय संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ.फारुख शेख,डॉ.श्रीहरी बुडगेमवार,डॉ. शेटवाड,डॉ सतीश धमने,डॉ. शिवसांब वडेर,डॉ. अविनाश पाळेकर आदींची उपस्थिती होती. 


गेल्या अनेक वर्षांपासून या संस्थेच्या माध्यमातून मुखेड शहरासह तालुक्यात वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात.

असाच एक सामाजिक उपक्रम हाती घेत थंडीच्या दिवसात गरजूंना ब्लँकेटचे वाटप केल्याने वैद्यकीय संस्थेच्या तालुक्यातील विविध स्तरातून कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या