सिरपूर येथे जाळली कडब्याची गंजी अज्ञात आरोपीविरुद्ध पालम ठाण्यात गुन्हा
पालम प्रतिनिधी : जनावरांच्या कडब्याची गंजी आज्ञात आरोपीने सूडबुद्धीने जाळली. ही घटना पालम तालुक्यातील सिरपूर येथे 27 डिसेंबरच्या पहाटे घडली. सायंकाळी अज्ञात आरोपीविरुद्ध पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सिरपूर येथील हभप देवराव महाराज दुधाटे यांच्याकडे औताचे दोन बैल आणि तीन दुधाळ म्हशी आहेत. त्यांच्यासाठी शेतातील आखाड्यावर दुधाटे महाराजांनी 500 कडब्याची गंजी लावली होती. ती अज्ञात आरोपीने सूडबुद्धीने सोमवारी पहाटे जाळून टाकली. सकाळी झोपेतून उठल्यावर कडब्याची गंजी जळत असल्याचे दुधाटे महाराजांच्या निदर्शनास आले. त्यांनी आग विजवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. तो असमर्थ ठरल्याने दुधाटे महाराज यांचे जवळपास दहा हजारांचे नुकसान झाले. त्याहीपेक्षा मुक्या जनावरांच्या तोंडातील घास हिरावून गेल्याने दुधाटे महाराज यांना अश्रू अनावर झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालम पोलिस ठाण्याचे जमादार विनोद चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तद्नंतर दुधाटे महाराज यांच्या फिर्यादीवरून पालम पोलीस ठाण्यात सोमवारी पहाटे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास जमादार विनोद चव्हाण करीत आहेत.
फोटोओळी : पालम तालुक्यातील शिरपूर येथील हभप देवराव महाराज घाटे यांची जळालेली कडव्याची गंजी.

0 टिप्पण्या