वंचित बहुजन आघाडी उस्मानाबाद टीमच्या पाठपुराव्यास यश . तुळजापूर तहसीलदारांनी आखेर गावात जाऊन केला रेशन दुकानाचा पंचनामा

 वंचित बहुजन आघाडी उस्मानाबाद  टीमच्या पाठपुराव्यास यश . तुळजापूर तहसीलदारांनी आखेर गावात जाऊन केला रेशन दुकानाचा पंचनामा

उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी प्रविण राठोड

 दि. 22 नोव्हेंबर 2021 रोजी बाभळगाव तालुका तुळजापूर येथील तरुणांनी रात्री  राशन दुकानदार सागर पाटील यांचा टेम्पो सोलापूर येथे राशनचे धान्य काळाबाजार विक्रीसाठी नेत असताना पकडल्याची   बातमी प्रसिद्ध झाली .या बातमी ची  शहानिशा करण्यासाठी  वंचित बहुजन आघाडी च्या महिला जिल्हाध्यक्ष एडवोकेट जिनत प्रधान यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी ची टीम बाभळगावात पोहचली यामध्ये जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव, जिल्हा कोषाध्यक्ष विद्यानंद वाघामरे , युवा नेते अंकोल वाघमारे हे पोहचले होते. या प्रकरणी  गावातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊन सदर  राशन दुकानदार पावत्या न देता धान्य वाटप करत आहे .त्याबरोबरच अनेक कुटुंबाचे राशन कार्ड स्वतः ठेवून घेतलेले आहेत , राशन कार्डसाठी पैशाची मागणी , आरेरावी ची भाषा, आशा अनेक तक्रारी ग्रामस्थानी वंचित बहुजन आघाडी च्या टिम पुढे त्यांच्याशी चर्चा केल्या नंतर केल्या होत्या .

वंचित बहुजन आघाडीच्या रेटयामुळे आता तुळजापूर तहसीलदार व त्यांच्या टिम ने गावत जाऊन नागरीकांची गा -हाणी ऐकूण पंचनामा केला व वंचित बहुजन आघाडीने व्हायरल केलेल्या बाबीच निदर्शनास आल्या आहेत.

वास्तविक पाहता दि.22/11/2021 ला सदर राशन दुकानचा माल पकडला मात्र प्रशासन त्याकडे कानाडोळा करत असल्याचे लक्षात येताच दि.3/12/2021 रोजी वंचित बहुजन आघाडीची टीम समक्ष बाभळगावात पोचली व व्हायरल झालेल्या बातमीची सत्यता पडताळून बातमी प्रसिध्द करून पाठपुरावा केला होता . या पाठपुराव्या मुळे सदर राशन दुकानदारावर कारवाई करण्याच्या दृष्टीने तहसीलदार यांनी गावात जाउन पंचनामा केला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या