गंगाखेड येथे विनोदअण्णा भोसले यांचे व्याख्याण

 गंगाखेड येथे विनोदअण्णा भोसले यांचे  व्याख्याण

गंगाखेड प्रतिनिधी :- जिजाऊ-सावित्री जन्मोत्सव सोहळ्या निमित्त गंगाखेड येथील खडक पुरा गल्ली  महिला बचत गटाच्या वतीने दि.3 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता *महिलांच्या स्फूर्ती नाईका जिजाऊ सावित्री* या विषयावर महाराष्ट्रातील नामवंत *व्याख्याते विनोदअण्णा भोसले* यांचे समाजप्राबोधन पर  व्याख्याणाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रमूख पाहुण्या म्हणून सौ अंजना बीडगर प्रकल्प अधिकारी नगर पालिका गंगाखेड यांची उपस्थीती रहाणार आहे 

या कार्यक्रमात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या शिक्षणाचा फायदा घेऊन गगन भरारी घेणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते विनोदअण्णा भोसले  यांच्या हस्ते करण्यात येणार आहे 

 खडक पुरा गल्ली सह गंगाखेड शहरातील महिलांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घ्यावा  असे आवाहन महिला बचत गट खडक पुरा गल्ली गंगाखेड यांनी केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या