दडपण चित्रपटाचे दिग्दर्शक निलेश किसनराव आहेर यांना कला क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर

 दडपण चित्रपटाचे दिग्दर्शक निलेश किसनराव आहेर यांना कला क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर 

परांडा प्रतिनिधी विजय शेवाळे

     सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था औरंगाबाद व माणुसकी रुग्णसेवा समुह शासकीय रुग्णालय घाटी यांच्या संयुक्त विद्यमाने पाचव्या वर्धापन दिनानिमित्त कला क्षेत्रातील श्री. निलेश किसनराव आहेर "दडपण चित्रपट दिग्दर्शक"यांना सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

 हा पुरस्कार सोहळा मौलाना आझाद संशोधन केंद्र, टिव्ही सेंटर औरंगाबाद येथे संपन्न होणार आहे. माणुसकी समुहाच्या पाचव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा-सकाळी १०:००वाजता महारक्तदान शिबीर शासकीय रक्त पेढी साठी १:०० वाजता मान्यवरांच्या हस्ते सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा 

समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३१ व्यक्तिंचा गुण गौरव या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. त्यापैकी श्री. निलेश किसनराव आहेर" दडपण चित्रपट दिग्दर्शक "कॅमेरा, साऊंड, लाईट, आर्टिस्ट रेडी, ओके ॲक्शन हे परवलीचे शब्द उच्चारले की, चंदेरी दुनियेची माया नगरीची अर्थात चित्रपट सृष्टीची आठवण येते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या