माधव एम सुवर्णकार व ऋषिकेश एस बोधनकर(मामा,भाचे) राष्ट्रीय पुरस्कारने सन्मानित.


माधव एम सुवर्णकार व ऋषिकेश एस बोधनकर(मामा,भाचे) राष्ट्रीय पुरस्कारने सन्मानित.

तासगाव प्रतिनिधी

तासगांव. जि. सांगली येथील ओ एच एच रेअर ब्लड ग्रुप ऑफ असोसिएशन संचलित बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर महाराष्ट्र. या सामाजिक संस्थेच्या वतीने. बरबडा ता. नायगांव. जि.नांदेड. येथील भूमीपुत्र.

मी रक्तदाता नांदेड. ग्रुपचे व्यवस्थापक व बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर नांदेडचे संस्थापक व उदगीर येथील रक्तमित्र ऋषिकेश एस बोधनकर यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

तासगांव. जि. सांगली येथे आयोजित पुरस्कार प्रदान कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन माधव एम सुवर्णकार व ऋषिकेश एस बोधनकर. यांना सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यासाठी बी.जी.चितळे. उद्योग समूहाचे संचालक गिरीष कुलकर्णी, माय लॅब डिस्कवरी सोल्युशन कंपनी संचालक श्रीकांत पाटोळे, सीइओ कंपनीचे संचालक संजीव कुलकर्णी, बॉम्बे ब्लड ग्रुप असोसिएशनचे संस्थापक विक्रम यादव सर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

बॉम्बे ब्लड ग्रुप डोनर नॅशनल अवॉर्ड 2021 या पुरस्कारासाठी देशभरातून सामाजिक क्षेत्र तसेच रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 22 राज्यातील 22 सामाजिक संस्था देशा बाहेर 5 सामाजिक संस्था व महाराष्ट्र राज्यातील 16 व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.

दरम्यान हा पुरस्कार मिळाल्याबद्दल (मामा,भाचे) माधव एम सुवर्णकार व ऋषिकेश एस बोधनकर यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या