खंडोबा यात्रेनिमित्त उंद्री प.दे.ता. मुखेड येथे जंगी कुस्त्यांचा फड.
नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख मनोज बिरादार
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी समस्त गावकरी मंडळी उंद्री (प. दे.) (ता. मुखेड जि. नांदेड )यांच्या वतीने मल्हारी म्हाळसाकांत भगवान श्री खंडोबा मंदिर वर्धापन दिनाच्या निमित्ताने भव्य यात्रा, जंगी कुस्त्यांचा फड व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी सर्व भाविक,व्यावसायिक, व्यापारी व कुस्ती पट्टुंनी उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवावी.
यात्रा महोत्सवातील कार्यक्रम=दि.03/12/2021 शुक्रवार रात्री ठीक 09:00वाजता जागरण दि.04/12/2021 शनिवार संध्याकाळी ठीक 06:00 वाजता भगवान खंडेरायाची पालखी मिरवणूक सोहळा दि.05/12/2021 रविवार सकाळी ठीक 10:00वाजता आरती व महाप्रसाद दुपारी ठीक 02:00वाजता कुस्त्यांचा फड.
अशा प्रकारे आयोजन करण्यात आले आहे .तरी पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा . असे आवाहन यात्रा समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

0 टिप्पण्या