कुंचेली ता नायगाव येथे दिव्यांग वृध्द निराधार बोर्डाचे अनावरण मेळावा संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांच्या हस्ते संपन्न.

 कुंचेली ता नायगाव येथे दिव्यांग वृध्द निराधार बोर्डाचे अनावरण मेळावा संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांच्या हस्ते संपन्न.

नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख मनोज बिरादार

नायगाव तालुक्यातील कुंचेली  येथे दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र या शाखेचे उदघाटन संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर,मेळाव्याचे अध्यक्ष  पो. पाटिल राजकुमार होनराव हे होते.

     प्रमुख पाहुणे जि अध्यक्ष ज्ञानेश्वर,नव़ले जी संपर्क प्रमुख नागोराव बंडे,ता अध्यक्ष विठ्ठलराव बेलकर,मुखेड ता अध्यक्ष आर एम कांबळे, बिलोली ता अध्यक्ष बालाजी होनपारखे ,ग्रामसेवक 

पञकार मुश्ताक सर ऊध्दव बोयाळ, ईत्यादी पाहूण्याचा सत्कार गावकर्‍यांच्या  वतीने सत्कार करण्यात आला. 

     सुञसंचलन मोहन झोकदार यांनी केले. 

         संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिव्यांग वृध्द निराधार यांच्या हक्काची जानिव शासन प्रशासनास व्हावी, म्हणून गाव तिथे शाखा उपक्रम नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गाव तेथे शाखा अभियान चालु असुन  तळागाळातील दिव्यांग, वृध्द, निराधार बांधवांना संघटित करुन शासन प्रशासनाचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी कुंचेली ता  नायगाव येथे दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र अशा प्रकारे गाव तेथे शाखा स्थापन करून दिनदुबळ्या दिव्यांग वृध्द निराधार यांना दरमहा एक हजार अनुदान मिळते तेहि चार महिने मिळत नाही त्यात दूधाचे पाकिट मिळत नाही त्यासाठी आपल्या हक्कासाठी संघटितपणे लढाईत सामिल व्हावे असे डाकोरे पाटिल यांनी आव्हान केले.

     ग्रामविकास अधिकारी  शिंदे यांनी दिव्यांग बांधवांचा राखिव पाच टक्के निधी आठ दिवसांत देण्याचे आश्वासन दिले 

    कार्यक्रमाचे अध्यक्ष पो पाटिल व्होनराव यांनी संघटितपणे संघर्ष केल्याशिवाय काहि मिळत नसल्याने आपल्याच गावचे भुमीपुञ डाकोरे पाटिल यांनी त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जातात एका उपक्रमात कोणा काळात चांगली सेवा करणार्याना त्यांनी पुरस्कार प्रमाणपञ देऊन माझ्या रामतिर्थ  पोलीस निरीक्षक व माझा सन्मान केला असे अनेक उपक्रम घेऊन दिनदुबळ्याना न्याय देण्याचा प्रयत्न करतात तरी सर्वानी त्याचा सोबत संघटित होण्याचे आव्हान केले. 

       हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष रावसाहेब पा बसवदे,श्रीपतराव डाकोरे, दिंगाबर भुरे,केरबा पा शिंपाळे, शादुल पटेल, गणेश बसवदे, दिंगाबर जोंधळे,गुलाब बोयाळ, केरबा बोयाळ, साहेबराव बोयाळ ,मारोती शिंपाळे. गुंडाजी बोयाळ ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते असे प्रसिद्ध पञक ता दिंगाबर भुरे यानी दिली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या