रिलायन्स फाउंडेशन मार्फत शेतकरी महोत्सव साजरा

 रिलायन्स फाउंडेशन मार्फत शेतकरी महोत्सव साजरा

 पालम  प्रतिनिधी गोपीनाथ शिनगारे 

     रिलायन्स फाउंडेशन व अजंता शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून स्व.धीरूभाई अंबानी यांच्या जयंती निमित्त प्रत्येक वर्षी शेतकरी महोत्सवाचे आयोजन केले जाते.याचे औचित्य साधून शेतकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.याचा मुख्य उद्देश म्हणजे अवघ्या जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान,विचारांची देवाण घेवाण,प्रशासन व शेतकरी यातील संबंध मजबूत करणे व तसेच योग्य बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी मदत करणे हा होता.


    या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गंगाखेड चे तालुका कृषी अधिकारी बनसावडे सर,मंडळ कृषी अधिकारी शितल पौळ,सामाजिक कार्यकर्ते बंडू सोळंके(शेतकरी संघटना),सखाराम बोबडे  पडेगांवकर (शेतकरी मित्र)

हेमचंद्र शिंदे, बंटी लांडगे सर

(पिक विमा अभ्यासक) यांची विशेष उपस्थिती होती.


सर्व प्रमुख पाहुण्यांनी शेतकऱ्यांना सुधारित शेती,शेतीला जोडधंदा,शेतकरी गट,प्रगतशील शेतकरी,व्यावसायिक शेती,सूक्ष्म सिंचन, भाजीपाला व फळबाग लागवड,हवामान बदल,शासकीय योजना व पीक विमा आदी विषयांवर मार्गदर्शन केले.तसेच विविध कंपन्यांचे  शेतकऱ्यांनी स्टॉल देखील लाभले होते.तसेच श्री रावसाहेब परमार यानी रिलायंस फाउंडेशन कडुन केले गेले कार्य व परिमाण सांगण्यात आले.

 श्री रोहिदास निरस यांच्या कडुन अजन्ता शेतकरी संघाचे काम व भविष्य ची वाट चाल सांगण्यात आली.


अशी माहिती रिलायन्स फाउंडेशन चे रावसाहेब परमार व अमोल पाटील खंडागळे यांनी दिली.

 या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रगतशील शेतकऱ्यांचा व गटातील महिलांचा प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कृष्ट पध्दतीने गोपीनाथ शिनगारे सर यांनी केले तर आभार श्री अमोल खंडागले यानी मांडले.

कार्यक्रमासाठी 40 पेक्षा जास्त गावातील 300 पेक्षा जास्त शेतकरी व महिला उपस्थित होत्या.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रावसाहेब परमार सर, अमोल खंडागळे सर, योगेश जोशी सर, मंचक कराळे सर,रोहिदास निरस, सतिश अडे ,संभाजी कांबळे, राजाभाऊ खोडवे, रमेश चव्हाण,लक्ष्मण देवकते, बाबूमिया शेख, मुरली मुंढे, देवा कौटुंबे,गणेश काळे,सचिन अडे, विलास काळे, दिपक पवार या सर्वांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या