श्रीमंतराजे प्रतिष्ठाणला जिल्हा युवा मंडळ पुरस्कार प्रधान
परंडा प्रतिनिधी- विजय शेवाळे
परंडा:- परंडा तालुक्यातील कपिलापुरी येथील श्रीमंतराजे प्रतिष्ठाण कपिलापुरी या बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेस जिल्हा युवा मंडळ प्रथम पुरस्कार २०१९/२०२० हा नेहरू युवा केंद्र मध्यवर्ती इमारत उस्मानाबाद येथे प्रदान करण्यात आला.
प्रतिवर्षी जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या युवा मंडळास नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद क्रीडा मंत्रालय भारत सरकार चा जिल्हा युवा मंडळ प्रथम पुरस्कार देण्यात येतो कोवीड च्या संसर्गामुळे हा पुरस्कार २०१९/२०२० मध्ये देण्यात आलेला नव्हता म्हणून दि१५ डिसेंबर २०२१ रोजी सन २०१९/२०२० चा जिल्हा युवा मंडळ प्रथम पुरस्कार श्रीमंतराजे प्रतिष्ठाण कपिलापुरी ता.परंडा या संस्थेला भाजपा जिल्हाध्यक्ष मा. श्री नितीनजी काळे नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी मा.श्री धनंजय काळे कार्यक्रम अधिकारी नानासाहेब पाटील भाजपा जिल्हा चिटणीस रामचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
२०१७ सालापासून परंडा तालुक्यामध्ये स्वच्छता, श्रमदान शिबीर, विविध व्यवसाय प्रशिक्षणे, भाषण स्पर्धा, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, कायदेविषयक शिबीरे,आरोग्य शिबिरे , मतदान जनजागृती, मतदान नोंदणी जनजागृती, मोफत रोपे वाटप करणे, पोषण आहार, पाणी आडवा पाणी जिरवा,शासकीय योजनांची जनजागृती,वृक्ष संवर्धन, प्लॅस्टिक मुक्त गाव असे विविध काम केल्यामुळे सन(२०१९/२०२०)चा जिल्हा युवा मंडळ पुरस्कार श्रीमंतराजे प्रतिष्ठाण संस्थेचे अध्यक्ष रणजीत महादेव पाटील यांना आज विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
परंडा तालुक्यातील हा पुरस्कार मिळालेलली ही प्रथम संस्था आहे.परंडा तालुक्याचा नावलौकिक वाढविण्यासाठी व खेड्यातील संस्थांदेखील उत्तम प्रकारे कार्य करतात व त्यांची दखल नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद (भारत सरकार) योग्य परिने घेते याचे उदाहरण होणार आहे.संस्थेचे मार्गदर्शक समाधान लटके व रामचंद्र कुलकर्णी मार्गदर्शनातून संस्था वाढीस लागली आहे.

0 टिप्पण्या