नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंबुलगा येथे अतिवृष्टीचे अनुदान गाव निहाय सुरळीत वाटप.

 नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंबुलगा येथे अतिवृष्टीचे अनुदान गाव निहाय सुरळीत वाटप.

 नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख मनोज बिरादार

 अतिवृष्टीने परिसरातील मूग उडीद कापूस सोयाबीन तूर आदी पिकांची नासाडी झाली होती. शासनाने नुकसान भरपाईपोटी मदत घोषित केली. त्यामुळे शेतकऱ्यांचे नजरा शासनाने घोषित केलेल्या अनुदान कधी मिळणार याकडे होत्या.  अनुदान मिळत असल्याने शेतकर्‍यात आनंदाचे वातावरण आहे.

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे अतिवृष्टीचे अनुदान गाव निहाय सुरळीत वाटप चालू आहे. काही दिवसापूर्वी बँकेकडून अनेक शेतकऱ्यांना एटीएम कार्डचे वाटप झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होत असून रांगेत न थांबता थेट एटीएममधून पैसे काढता येत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कोरोना नियमाचे तंतोतंत पालन करून सहकार्य करावे. ज्या शेतकऱ्यांना एटीएम कार्ड मिळालेले नाहीत असे शेतकरी व उर्वरित शेतकऱ्यांना बँकेतून अनुदानाची रक्कम वाटप करण्यात येत आहे. इंग्रजी अक्षराच्या क्रमानुसार गावनिहाय अनुदान वाटप सुरू आहे. अपुरे मनुष्यबळ आणि खातेदारांची संख्या जास्त असल्यामुळे या कामाचा कर्मचाऱ्यावर ताण पडत आहे यामुळे शेतकऱ्यांनी बँकेत गर्दी करू नये व एटीएम कार्डचा वापर करून गैरसोय टाळावी. तसेच बँकेने केलेल्या नियोजनाप्रमाणे गावनिहाय अनुदान वाटप सुरू असल्याची माहिती बँकेचे शाखा मॅनेजर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या