शिवसेना आमदार तानाजी सावंत बंडखोरीच्या तयारीत! मुख्यमंत्री ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष..

 शिवसेना आमदार तानाजी सावंत बंडखोरीच्या तयारीत! मुख्यमंत्री ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष..

परंडा प्रतिनिधी विजय शेवाळे : राज्यात सत्ता बदलाची चर्चा भाजप नेते करत असतानाच आता सत्ताधारी शिवसेनेच्या एका आमदारानेच येत्या तीन-चार महिन्यात राज्यातील सत्तेचे दिवस बदलतील का पुन्हा वेगळ्या रुपात तुमच्या समोर येणार का काही मागायचं ते मागा असे सांगत त्यांनी सत्ता बदलाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना आमदारांमध्ये असलेली खदखद पुन्हा एकदा या निमित्ताने समोर आली आहे. भूम-परांड्याचे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी हे वक्तव्य केले आहे. या संदर्भातील त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.त्यांच्या व्हिडीओची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. शिवसेनेचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यातील छुपा राजकीय संघर्ष नुकताच समोर आला आहे. त्यातच शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचा हा व्हिडिओ समोर आल्याने शिवसेना आमदारातील नाराजी व खदखद पुन्हा एकदासमोर आली आहे. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस , काॅंग्रेस सोबत युती केल्यामुळे अनेकांना मंत्रीपदापासून दूर राहावे लागले आहे. त्यातच शिवसेना आमदारांची कामे होत नसल्यानेही काही शिवेसना आमदारांमध्ये नाराजी आहे. त्यातूनच आमदार तानाजी सावंत यांनी हे वक्तव्य केले असावे असा अदांज राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या