पालम-लोहा महामार्गावर क्रुझर व कारचा भीषण अपघात, तिघे जागीच ठार.
पालम प्रतिनिधी :- अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होऊन दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
| पालम-लोहा महामार्गावर भिषण अपघात, क्रुझर व कारची समोरासमोर धडक, तिघे जण जागीच ठार
26 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता पालम ते लोहा राष्ट्रीय महामार्गावरील पेठशिवनी येथे अपघात घडला. पालमवरुन नांदेडकडे (एमएच-04 इटी-2734 )क्रमांकाची कार लोह्याकडे जात होती. या कारची लोह्याकडून पालमकडे येणाऱ्या (एमएच-22एमएच- 6333) क्रमांकाच्या क्रूजरसोबत अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पेठशिवणी परिसरात या दोन्ही गाड्यां भरधाव वेगात असल्याने, दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात कारमधील चार पैकी, तिघे जागीच ठार झाले. अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होऊन दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पालम पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप काकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बाहत्तरे,फौजदार विनोद साने यांच्यासह आदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

0 टिप्पण्या