नागोराव तिप्पलवाड यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचा राज्यस्तरीय गुणीजन गौरव पुरस्कार
बरबडा प्रतिनिधी :- पुणे शहरात दि २४ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय गुणिजन गौरव पुरस्कार सोहळा संपन्न झाला त्यात तिप्पलवाड नागोराव मारोती उर्फ एन टी सर बरबडेकर यांना राज्यस्तरीय गुणिजन पुरस्कार २०२१ ने सन्मानित करण्यात आले
प्रमुख पाहुणे ह-भ-प मा श्यामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर, सुप्रसिद्ध विचारवंत, लेखक, कवी तसेच समारंभाचे अध्यक्ष मा. रमेश आव्हाड ,माजी पोलीस अधिकारी मुंबई,सुप्रसिद्ध साहित्यिक, पत्रकार संस्थापक मानवधन शैक्षणिक संस्था नाशिक समारंभ मार्गदर्शक माननीय सौ मीनाक्षी गवळी
जगदाळे समाजसेविका नाशिक, मा. प्रकाश सावंत संयोजक,पुरस्कार मानकरी महामंच महापरिषद समन्वयक इत्यादी मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्याना स्मृतिचिन्ह, गौरवपदक, मानपत्र, महावस्त्र मानकरी बॅच व मानाचा फेटा देऊन गौरविण्यात आले आहे
नायगाव तालुक्यातील बरबडा नगरीचे भूषण असलेले,सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व, जवाहरलाल नेहरू विद्यालय बरबडा येथील आदर्श शिक्षक तिप्पलवाड नागोराव मारोती ऊर्फ एन.टी.बरबडेकर यांची निवड झालेली असून अत्यंत प्रतिष्ठेचा हा पुरस्कार आपल्या बरबडा नगरीतील शिक्षकाला मिळतोय ही संबंध शिक्षकी पेशासाठी व बरबडा वासियांसाठी अभिमानास्पद व मान उंचावणारी बाब आहे.
एक ग्रामीण भागातील शिक्षक समाजसेवक व समाजात शिक्षकाची प्रतिमा उंचावन्यासाठी अविरत धडपडणारे व्यक्तिमत्व म्हणजे एन. टी. गुरुजी होय व अशा धडपड करणाऱ्या शिक्षकांचा अचूक शोध घेऊन त्यांच्या कलागुणाची अखंड २९ वर्षापासून सेवा करत असताना त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कृत करणारी लोकसेवा अकादमी व अकादमीचे निस्सीम उदात्त विचारांचे कार्यकर्ते यांचे बरबडा वासीयांनी आभार मानावेत तेवढे कमी आहेत.आदरणीय तिप्पलवाड याना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्यामुळे बरबडा नगरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.
त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य दिलीपराव धर्माधिकारी उपाध्यक्ष सदाशिवराव धर्माधिकारी माजी प्राचार्य सुरेवाड व्ही टी शिवाजीराव धर्माधिकारी इरना कंडापले सरपंच माधवराव कोलगाने उपसरपंच सौ छायाताई धर्माधिकारी, माजी सरपंच बालाजी मदेवाड सर्व ग्रामपंचायत सदस्य, उपमुख्याध्यापक बडूरे जी पी, पर्यवेक्षक शिंदे व्ही आर विश्वनाथ बडूरे व परिसरातील सर्व शिक्षक, पालक, आजी माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे

0 टिप्पण्या