अपघातामध्ये मृत शेतकरी यांच्या कुटूंबाची सांन्तवनपर भेट कर्मचा-यांनी बनवला गोपिनाथराव मुंडे अपघात विमा योजना प्रस्ताव
परांडा तालुका प्रतिनिधी विजय शेवाळे
शेळगाव:-(शासकीय कर्मचा-यांच्या माणूसकीचे एक अनोखे दर्शन)परंडा तालुक्यातील सक्करवाडी येथील रमेश चव्हाण या शेतक-याच्या दुचाकीची धडक ट्रँक्टरला बसून 10 डिसेबर रोजी त्यांचा जागीच मृत्यू झाला.
कुटूंबातील तरूण कर्ता माणूस अचानक गेल्याने संपूर्ण कुटूंबावरच दु:खाचा डोंगर पसरला एवढेच नव्हे तर आपल्या सुस्वभावाने संपूर्ण गावाला हवेहवेसे वाटणारे व्यक्तीमत्व असल्याने संपूर्ण गावावरच शोककळा पसरली होती . घरची आर्थिक परिस्थिति हालाखिची असून त्यांच्या पश्चात वृध्द थकलेले वडिल ,आई, पत्नी एक मुलगी व मुलगा असा परीवार आहे.
अपघातामध्ये अचानकच निघून जाणे ही गोष्ट मनाला चटका लावून जाणारी अशीच आहे. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 मध्ये जलमित्र म्हणून रमेश चव्हाण यांनी खूप मोठे योगदान दिले होते. आज गाव पाणीदार झाले पण एक जलमित्र हरवला याची सल सर्वांणाच आहे.
या कुटूंबाला दु:खातून बाहेर काढण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याची भावना गावकरी तसेच कर्मचारी या सर्वांचीच आहे. याचाच एक भाग म्हणून गावचे तलाठी ढोणे साहेब,नागलोत साहेब यांनी पिडीत कुटूंबियांची भेट घेऊन त्यांनी आश्वस्त केले व संपूर्ण प्रशासकिय मदतीचा हात पुढे करत गोपिनाथराव मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला. सक्करवाडी येथील रूग्णसेवक तय्युब शेख यांनी स्वत:चा असलेला वाढदिवस टाळून, त्यावरील खर्चाला बगल देत या कुटूंबाला मदत करण्याचा संकल्प केला व येत्या काळामध्येही हा रूग्ण सेवेचा वसा सातत्याने पुढे नेण्याचा संकल्प केला.यावेळी सिध्देश्वर चव्हाण, दशरथ चव्हाण, उध्दव शिंदे, इजाज पठाण उपस्थित होते.

0 टिप्पण्या