डिग्रस येथे एकात्मिक शेती व्यवस्थापन प्रशिक्षण व विविध शासकीय योजनांची जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
पालम प्रतिनिधी :- डीग्रस येथील महादेव मंदिरामध्ये रिलायन्स फाऊंडेशन गंगाखेड यांच्या माध्यमातून एकात्मिक शेती व्यवस्थापन प्रशिक्षण आणि विविध शासकीय योजनांची जनजागृती पर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यामध्ये रब्बी हंगामातील हरभरा , ज्वारी या पीकावषयी एकात्मिक किड व्यवस्थापन व शासनाच्या विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन प्रशिक्षक संतोष गुजर सर यांनी केले.हवामानावर आधारित शेती आणि गट शेती ही काळाची गरज आहे. तसेच सेंद्रिय शेती हा एकच उपाय आहे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
रिलायन्स फाऊंडेशन गंगाखेड शेतकर्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करते तसेच कॉन्फरन्स कॉलच्या माध्यमातून वेळोवेळी शेतकर्यांना सहकार्य करत असते. या कार्यक्रमाला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपीनाथ शिनगारे सर यांनी केले.

0 टिप्पण्या