ग्रामपंचायत राजुरा तांडा च्या विकास कामास गती तर आमदार डॉ तुषार राठोड यांनी विकास कामांसाठी दिले 5 लक्ष रुपये.
नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख मनोज बिरादार
ग्रामपंचायत राजुरा तांडा येथील अनेक जनहितार्थ व तेथील ग्रामस्थांना सुख सुविधा उपलब्ध करून आपल्या गावच्या विकासाला गती देण्यासाठी सरपंच परशुराम चव्हाण, मा.सरपंच शिवाजी चव्हाण, उपसरपंच किरण भाऊ चव्हाण यांच्या कार्यकाळात विकास कामे खूप जोमाने होत आहेत
अवघ्या 10 महिन्यात पाईप लाईन, शोषखड्डे , अंडरग्राऊंड नाली, फेवर ब्लॉक, मंदिरासाठी सेवा सदन,तसेच गावाला हागणदारी मुक्त करण्याचा निर्धार मनात बाळगून 50 स्वच्छालय कामाचे भूमिपूजन पार्टी प्रमुख मा. सरपंच शिवाजी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच प्र परशुराम चव्हाण, उपसरपंच प्र किरण भाऊ चव्हाण,बाबाराव चव्हाण,भाऊराव राठोड,बाबाराव राठोड, बालाजी राठोड,गोविंद महाराज,प्रकाश राठोड, राजू चव्हाण,तुकाराम राठोड, सेवालाल राठोड,आदी नागरिक उपस्थित होते.
विशेष म्हणजे तेथील तंड्याची लोकसंख्या खूप कमी असल्यामुळे या छोट्याश्या ग्राम पंचायत साठी आज पर्यंत कोणता आमदार किंवा जिल्हा परिषद सदस्य ,पंचायत समिती सदस्य ,कोणी विकास कामासाठी निधी दिले नाही पण कार्यसम्राट आमदार डॉ तुषार राठोड साहेबांनी वयक्तिक लक्ष देवून कुलदैवत आई जगदंबा माता संत सेवालाल महाराज सेवा सदन मंदिरासाठी 5 लक्ष देवून खूप मोठे काम केले आहे. आज पर्यंत कोणी कसलाच निधी दिला नाही पण आमदार डॉ तुषार राठोड साहेब यांच्या कार्यकाळात त्या छोट्याश्या तांड्याला न्याय भेटला.
त्यामुळे आमदार डॉ तुषार राठोड साहेबाचे राजुरा तांडा या गावातील जनतेकडून आभार व्यक्त करत आहेत.विशेष म्हणजे किरण भाऊ चव्हाण उपसरपंच यांच्या पाठपुरव्यामुळे हे काम होत आहे.त्यानी सतत आमदार राठोड यांना लोकांची सेवा सदन मागणीबद्दल आमदार यांच्या कडून 5 लक्ष रुपयांचा निधी आणल्याने किरण चव्हाण यांचा विकास कामात फार मोलाचा वाटा आहे असे ग्रामस्थांकडुन बोलल्या जात आहे.

0 टिप्पण्या