आय सी आय सी आय बँक शाखा नांदेड च्या वतीने पार्वती महिला बचत गट यांना 10 लाख रुपयांचे कर्ज वाटप .

 आय सी आय सी आय बँक शाखा नांदेड च्या वतीने पार्वती महिला बचत गट यांना 10 लाख रुपयांचे कर्ज वाटप .

नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख मनोज बिरादार

 महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत यशोदीप लोक संचलित साधन केंद्र देगलूर यांच्या मार्फत तडखेल येथील पार्वती महिला बचत गट  यांना 10 लक्ष रोख रक्कम कर्ज देण्यात आले.

यावेळी नागमनी किशन घाटे उपजीविका समन्वयक यांनी सांगितले की लहुउद्योग ,महिला बळकटीकरण, प्रशिक्षण, विमा सुविधा, योजनेची सुयोग्य, अंमलबजावणी, महिलचे काबाड , कष्ट कमी करणे , तंत्रज्ञान सेवा प्रकल्प माहिती, कायदेविषयक सेवा ,कुटुंबिक सला, पशुपालन व देखभाल, उद्योग सुविधा, शेती पूर्वक सेवा ,आरोग्य सेवा ,बिगर शेती कर्ज,तांत्रिक माहिती व सुविधा गाव विकास समिती बळकटीकरण, महिला व बालके यांचे कुपोषण कमी करून सुदुरूड आरोग्य निर्माण करणे ,लहुपथ पुरवठा करून लहू व मोठे उद्योग उभारणी केली जाते गाव पातळीवर निर्णय प्रकियेत महिलचे स्थान निर्माण करणे अनेक प्रकल्प माविम मार्फत राबविण्यात येतात अशी माहिती यावेळी सांगितली.

यावेळी यशोदीप लोकसंचलित साधन केंद्राचे शाखाधिकारी पार्वती जाधव मॅडम, आय सी आय सी आय बँकेचे शाखाधिकारी अनिल माने सर, लेखापाल विजय मेटकेवार सर, उपजीविका समन्वयक नागमनी किशन घाटे, आयसीआयसीआय बँकेचे डेव्हलपमेंट अधिकारी उत्तम राठोड सर, तसेच बचत गट अध्यक्ष केराबाई चरकुलवार, सचिव सावित्रीबाई आऊलवार सह बचत गटातील सर्व सदस्य महिला उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या