पंधरा हजाराची लाच मागणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासन अधिकाऱ्याला अटक ; अँटी करप्शनची बुधवारी कारवाई

 पंधरा हजाराची लाच मागणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासन अधिकाऱ्याला अटक ; अँटी करप्शनची बुधवारी कारवाई

उस्मानाबाद प्रतिनिधी प्रविण राठोड

मुख्याध्यापकाकडे पद स्थापनेचा प्रस्ताव सादर करण्यासाठी पंधरा हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या जिल्हा परिषदेतील  कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.

सुहास अण्णाराव चेळेकर असे अँटिकरप्शनने अटक करण्यात आलेल्या कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याचे नाव आहे.दुपारी साडेबाराच्या सुमारास ही कारवाई झाली.

यातील तक्रारदार यांनी राज्यसरकारच्या पती-पत्नी एकत्रीकरण योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करणेकरीता यातील आरोपी लोकसेवक यांनी २५ हजार रुपये लाचेची मागणी करीत असलेबाबत ऑंन्टी क्राप्शन ब्युरो, सोलापूरकडे तक्रार दिली होती.

 जवळच्या रिक्त शाळेत मुख्याध्यापक पदी बदली होणेकरीता अर्ज दिला होता. सदर अर्जावर  मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे ०८.०९.२०२१ रोजी तक्रार प्राप्त झाली होती.

 सदर तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता यातील आरोपीने, तडजोडी अंती १५,००० रु. लाच मागणी केली आहे. 

याची शहानिशा झाल्यानंतर बुधवारी अँटीक्राप्शन विभागाच्या पथकाने या प्रकरणात आरोपी लोकसेवक सुहास चेळेकर यांना अटक केली आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये केवळ तीन दिवसात ही अँटीक्राप्शनची दुसरी कारवाई आहे. समाज कल्याण विभागातील कक्ष अधिकाऱ्याला तीस हजाराची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. या घटनेमुळे पुन्हा जिल्हा परिषदेमध्ये एकच खळबळ उडाली.

ही कारवाई संजीव पाटील, सहाय्यक. पोलीस आयुक्त लाचलुचपत.प्रतिबंधक.विभाग, सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक चंद्रकांत कोळी, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर,पोलीस अंमलदार पो.ना. प्रमोद पकाले, पो.ना.अतुल घाडगे, पौ.कों.गजानन किणगी, चा.पो.कों./शाम सुरवसे, सर्व नेमणुक ला.प्र.वि., सोलापूर. यांनी पार पाडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या