कुंटूरकर शुगर कारखान्या समोर मुजावपुरच्या ऊसतोड कामगारास जातीवाचक शिवीगाळ, कुंटूर पोलीस ठाण्यात बळेगावच्या तिघांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
नायागांव रुई प्रतिनिधी माधव पवार
देगलूर तालुक्यातील शहापूर (बेचिराक मुजावपूर ) येथील राहिवासी असलेले एका दलित कुटुंबातील रवींद्र जाधव हा यांनी कारखान्यावर काम करण्यासाठी ऊसतोडीचे पैसे घेतला होता परंतु कुंटूर शुगर कारखाना चालू होऊनही कामावर येत नसल्यामुळे त्या ऊसतोड कामगारास रुई ( बु.) शिवारात असलेल्या कारखान्याच्या समोर नायगाव तालुक्याच्या कुंटुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे बळेगाव येथील रहिवासी असलेल्या ठेकेदाराने जातीवाचक शिविगाळ करून मारहाण केल्या प्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात बळेगावच्या तिघाच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्या अंतर्गत घडलेल्या घटने प्रकरणी धर्माबादचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या आदेशानुसार ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार दिनेश येवले व फौजदार संजय अटकोरे यांनी बळेगावच्या तीन आरोपीवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला असून आरोपीस दिनांक २२ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी अटक करण्यात आल्याची माहिती ठाणे अंमलदार तथा पोलीस नाईक भार्गव सुवर्णकार यांनी दिली आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कुंटूरकर शुगर कारखान्याच्या समोर बळेगाव येथील रहिवासी असलेले आरोपी एस जी बेलकर ,एस जी बेलकर,बळवंत व्यंकटी मोरे यांनी फिर्यादी बुद्धभूषण रवींद्र जाधव वय २६ वर्ष यांना ऊस तोडीच्या कामासाठी कामावर का येत नाही म्हणून आरोपीने बोलावून घेऊन थापड बुक्याने मारहाण व अश्लील जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी बुद्धभूषण रविंद्र जाधव यांनी तक्रार कुंटुर पोलीस ठाण्यात केल्या प्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला यातील एक आरोपी बळवंत मोरे हा बाहेर गावाचा रहिवासी असला तरी हल्ली मुक्काम बळेगाव येथे असला तरी फिर्यादी देगलूर तालुक्याचा तर आरोपी नायगाव तालुक्याचे असून ॲट्रॉसिटीचा गुन्हा ? दाखल करण्यात आला आहे
कुंटूर पोलीस ठाण्याच्या हादीतील सदरची घटना ही दिनांक २० नोव्हेंबर २०२१ रोजीच्या रात्री ९ ते साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान कुंटूर शुगर करखान्याच्या समोर घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले असून आरोपीने फिर्यादी बुद्धभूषण जाधव राहणार देगलूर शहापूर ( बेचिराग मुजावपूर ) याना मारहाण केल्या प्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा २३४/ २०२१ कलम २९४,३२३,५०४,५०६,३४ भा.द.वीसह अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार कलम ३ (१) (आर) (एस) प्रमाणे दाखल करून धर्माबादचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी पुढील तपास करीत आहे

0 टिप्पण्या