मुखेडात माजी सैनिक संघटना कार्यकारणी जाहीर.
नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख मनोज बिरादार
माजी सैनिक विकास समिती संघटना नांदेड यांच्यावतीने नांदेड जिल्ह्यात अल्पावधीतच अतिशय चांगल्या प्रमाणे माझी सैनिकाचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्ह्यात चांगल्या प्रकारे धडाडीचे कार्य चालू असून त्याचाच एक भाग म्हणून 22 नोव्हेंबर 2021 रोजी मुखेड येथे माजी सैनिक विकास समिती संघटना नांदेड च्या वतीने एक महत्वपूर्ण बैठक पार पडली असून त्या बैठकीत मुखेड कार्यकारणीची निवड करण्यात आली आहे.
माजी सैनिक विकास समिती संघटना मुखेड तालुका अध्यक्षपदी माजी सैनिक भगवानराव गोविंदराव नागरगोजे तर महिला तालुका अध्यक्षापदी श्रीमती गंगासागर सुदामराव कांबळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. माजी सैनिक भगवानराव नागरगोजे यांच्या आतापर्यंतच्या शासकीय सेवेची व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी या निवड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई मेजर विक्रम थापा माजी सैनिक विकास समिती संघटना नांदेड जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवार , यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यकारणीचे उपाध्यक्ष म्हणून शिवाजी मुसंडे तर सचिव म्हणून अजित मोरे यांची निवड जाहीर करण्यात आली
यावेळी मार्गदर्शक म्हणून नामदेव पाटील जाहुरकर , प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानेश्वर पाटील डुमणे, सुभेदार देवकते सर, धोंडीबा सोपानराव नागरगोजे, किरण सुदामराव कांबळे इत्यादी माजी सैनिकाची प्रमुख उपस्थिती होती या निवडीबद्दल भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विठ्ठल पाटील येवतीकर व मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप कामशेटे व सचिव शेख मेहताब यांनी विशेष अभिनंदन केले आहे .

0 टिप्पण्या