पालम पेंटर संघटनेची कार्यकारणी जाहीर
पालम प्रतिनिधी
पालम येथील गांधी विद्यालयात 28 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र पेंटर संघटनेची बैठक घेण्यात घेवून त्यात पालम तालुका पेंटर संघटनेची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. बैठकीत औरंगाबाद येथे होणा-या अधिवेशनाची माहिती देण्यात आली.
बैठकीला पेंटर संघटनेचे राज्य प्रदेशाध्यक्ष प्रमोद अंबोरे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष किरण गायकवाड, उपाध्यक्ष बालाजी कौसे, संघटक शेख यासीन, सत्यशील गायकवाड, आरगडे, भालेराव होते. त्यात कोरोना काळात पेंटीग करून जनजागृतीचे काम करूनही पेंटरांना शासनाने मदतीपासून वंचित ठेवल्याबद्यल खंत व्यक्त करण्यात आली. तदनंतर पालम तालुका कार्यकारणी अध्यक्षपदी भिमराव पिराजी काचोळे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी विठ्ठल हरिभाऊ शिंदे, देविदास विश्वनाथ कांबळे, सचिव लिंबाजी चांदोजी इबीदार, सहसचिव हनुमंत दत्तराव पांचाळ, कोषाध्यक्ष दिपक कोंडींबा चव्हाण, संघटक विठ्ठल सिताराम मठपती, सहसंघटक शेख अखिल चाँदमीयाँ, सल्लागार सुभाष बळीराम शिनगारे यांची निवड करण्यात आली

0 टिप्पण्या