दिपावली निमित्ताने औचित्य साधून साडे येथे पंचवीस वर्षांनी फुलली माजी विद्यार्थ्यांची स्नेह मैफिल..

 दिपावली निमित्ताने औचित्य साधून साडे येथे पंचवीस वर्षांनी फुलली माजी विद्यार्थ्यांची स्नेह मैफिल..

परंडा प्रतिनिधी-विजय शेवाळे

शाळेचे दिवस संपले कि प्रत्येकजण करियरसाठी वेगवेगळ्या क्षेत्राकङे धाव घेतात,मात्र ज्या शाळेत आपण शिकलो,लहानाचे मोठे झालो,वेगवेगळ्या भागातील विद्यार्थ्यांशी मैत्रीची नाती जोङली व जपली,ती नाळ मात्र तशीच कायम  असते.

करमाळा तालुक्यातील साडे हायस्कूल साङे शाळेतून  सन 1996 मध्ये उत्तीर्ण होऊन गेलेल्या तब्बल पंचवीस वर्षांपूर्वीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा काल दिनांक 07/ 11/2021 रोजी  साडे येथे  आयोजित केला होता. 

यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील आणि मित्रांच्या जुण्या आठवणींना उजाळा दिला. 

ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा असे सांगत   खेङोपाङी, वाङीवस्त्यावर फिरणारे आणि ज्ञानाची दारे उघङी करून, सर्व समाजातील मुलामुलींना साङे हायस्कूल साङे वटवृक्षाच्या छायेत तब्बल पंचवीस वर्षांनंतर सन 1996 बॅच मधील छोटे छोटे मातीचे गोळे, त्यांना आपल्या संस्काराने आणि ज्ञानाने आकार देणार्या गुरुंना व 

दिलेल्या आकाराने झाले ते राजकीय सामाजिक व विविध क्षेत्रातील व छोटे मोठे उद्योजक ,  शेतकरी,व्यावसायिक, शिक्षण व विविध शासकीय निमशासकीय विभागातील  नोकरदार, इंजिनिअर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते,अजुनही वेगवेगळ्या क्षेत्रात नाविन्य मिळविलेले,आजच्या भारतामध्ये आधार स्तंभ एकत्रित येऊन ॠणानुंबंध कार्यक्रम अतिशय आनंदाने, उत्साहाने, मायेने,बंधुतेने साजरा करण्यात आला. वयाचा,वेळेचा,तब्येतीचा विचार न करता एका हाकेसरशी दिलेल्या आकारांना पहाण्यासाठी व आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून माजी शिक्षक के.एन शिंदे यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.त्यानंतर गुरूंचा श्रीफळ, शाल देऊन सन्मान आदरतिथ्य करण्यात आले.त्यानंतर 

पोलीस निरीक्षक संभाजी तागङ, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक  गणेश आङेकर, पोष्टमास्तर रमेश शेलार व माढा बाजार समितीच्या संचालिका सारीका पाटील, निता आरळकर व परंड्याचे सुनिल पवार व नंदकुमार पाटील,  तुकाराम फरतडे व शिंदे सर व   यांनी आपली

मनोगत व्यक्त केली. व उपस्थिती असलेल्या सर्वांनी परीचय संवाद मधुन  एकमेकांशी संवाद साधला, 

त्यानंतर स्नेह भोजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. 

गुरूंच्या छायेखाली राहून आम्ही अजून प्रगती करू आणि येणार्या पिढीसाठी आदर्श बनू,हीच माजी विद्यार्थ्यानी गुरूचरणी वंदना दिली. या वेळी माजी विद्यार्थी  नीता आरळकर , रूपाली तागमोगे , सारीका पाटील,  मधुराणी ढवळे, अनिता वरडोळे , सुर्वणा गोमे , राणी जगदाळे,  सुनंदा बदर ,व  रमेश शेलार, संभाजी तागड, गणेश आडेकर, तुकाराम फरतडे, नंदकुमार पाटील, तुकाराम पिसे,सुनिल पवार,नागेश गोसावी, बिटु दळवी, अशोक ठक्कर, ललित कदम,सुभाष लोंढे, विष्णु राऊत, संजय मस्कर, प्रमोद शिंदे, आदी उपस्थित होते. 

सर्व माजी विद्यार्थ्यांच्या एकत्रित सहयोगाने तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणार्या सर्व सहकार्याच्या मदतीने 25 वर्षांपूर्वी च्या जुण्या आठवणींना उजाळा देत एकमेकांशी संवाद साधला एकमेकांशी गुच्छ देऊन समान्न करण्यात आला हा दिवस अविस्मरणीय ठरला. शेवटी सर्वांचे आभार रमेश शेलार यांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या