प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीर ऊभा राहणार - आ.डॉ. रत्नाकर गुट्टे

  प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीर ऊभा राहणार - आ.डॉ. रत्नाकर गुट्टे

गंगाखेड प्रतिनिधी तुषार उपाध्याय

         परभणी महापालिकेतील नगरसेवक सचिन देशमुख यांनी स्वपक्षीय नेतृत्वावर एकाधिकार शाहीचा ठपका ठेवत काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याची बातमी आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी वाचली असता सामान्य कुटुंबातून आलेल्या आणि परभणी शहराच्या विकासासाठी तळमळ असणाऱ्या सचिन देशमुख सारख्या तरुणांना एकटे न पडू देता त्याच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहणार असे आमदार साहेबांनी व्यक्त केले.

            सचिन देशमुख सारख्या सामान्य सामान्य कुटुंबातील असूनसुद्धा आपल्या शहराच्या विकास कामासाठी तळमळीने पुढे येऊन काम करणार्या कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही. अशा कार्यकर्त्यांना राष्ट्रीय समाज पक्ष न्याय देणार असल्याची भावना याप्रसंगी आमदार गुट्टे यांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या