गंगाखेड विधानसभेच्या गंगाखेड, पालम, पुर्णा या तिनही तालुक्यात 'हात मदतीचा' उपक्रम राबवणारे लोकप्रिय युवा नेते संतोषभाऊ मुरकुटे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
पालम प्रतिनिधी
पालम :- गंगाखेड विधानसभेच्या गंगाखेड, पालम, पुर्णा या तिनही तालुक्यात 'हात मदतीचा' उपक्रम राबवणारे लोकप्रिय युवा नेते संतोषभाऊ मुरकुटे यांच्या वाढदिवसानिमित्त पालम शहरात व तालुक्यात आज दि.24 नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रम संपन्न झाले.
पालमवाशीयांतर्फे यावेळी संतोषभाऊ मुरकुटेंचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभात मुरकुटेंनी पालम हे श्री संत मोतीराम महाराजांचे जन्मगाव असून येथे महाराजांच्या नावाची भव्य कमान उभारण्याचे व पालम शहराला तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करून आवश्यक तो निधी आणून शहराचा कायापालट करण्याचे आश्वासन देत तालुक्यातील श्री क्षेञ फळा व पेन्डू येथेही निधी आणून या संतभुमीचा विकास केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे प्रतिपादन केले.
पालममधे संतोषभाऊ मुरकुटेच्या वाढदिवसानिमित्त माणीक मेडिकल येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद भेटला.यावेळी त्यांची देवानंद हत्तीअंबीरे यांच्याकडून शालेय उपयोगी साहित्याने तुला करण्यात आली व सदरील साहित्य माधवराव पाटील विद्यालयात गरीब विद्यार्थ्यांना भाई लक्ष्मणराव गोळेगावकर यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.
तसेच ग्रामीण रुग्णालय पालम येथे ऑक्सिजन काॅन्सरट्रेटर मशीन देत तिचे लोकार्पण संतोषभाऊ मुरकुटेंच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी डॉ. आंबटवार पालमचे माजी सरपंच लक्ष्मणराव रोकडे, नगराध्यक्ष जालिंदर हत्तीअंबीरे, नंदकिशोर बल्लोरे आप्पा,माऊली चांद तांबोळी पत्रकार घोरपडे,आनंद साखला,विलासराव चव्हाण,रामप्रसाद कदम, लिंबाजीराव टोले, पदुदेवा जोशी,अमोल रोकडे,देवानंद हत्तीअंबीरे,तसेच श्री साई ग्रुपचे सदस्य व संतोषभाऊ मुरकुटे मिञमंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

0 टिप्पण्या