अजब प्रशासनाचे गजब साकडे, कर्मचाऱ्याची नियुक्ती एकीकडे, काम मात्र दुसरीकडे

 अजब प्रशासनाचे गजब साकडे, कर्मचाऱ्याची नियुक्ती एकीकडे, काम मात्र दुसरीकडे

पालम प्रतिनिधी : प्रतिनीयुक्तीमुळे 12 वर्षांपासून गंगाखेड तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात कार्यरत असणा-या आरोग्य सहाय्यक भारत संभाजी नरवाडे यांना मुळ नियुक्तीच्या ठिकाणी रूजू होण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा, पालम तालुक्यातील रावराजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप लावून आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. 

जिल्हा आरोग्य अधिका-यांना 3 नोव्हेंबर रोजी या संदर्भातचे निवेदन दिले. त्यात म्हटले की, कोविड महामारीच्या काळात देखील नरवाडे रावराजूर येथे कर्तव्यावर नव्हते. वास्तविक येथे मनुष्यबळाची कमतरता असल्याने केंद्राकडून वेळेवर आरोग्य सुविधा मिळत नाहीत. नरवाडे कोणत्या शासन निर्णयानुसार एवढा काळ प्रतिनीयुक्तीवर राहू शकतात, असा सवालही उपस्थित केला आहे. आर्थिक आणि राजकीय दबावामुळेच ते दिर्घ काळापर्यंत प्रतिनीयुक्ती उपभोत आहेत. ती तात्काळ रद्य न केल्यास आरोग्य केंद्राला कुलूप लावण्यात येईल, असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावार जयसिंग पाटील, रामकीशन अळनुरे, अशोक अळनुरे, सुभाष अळनुरे, अभिषेक अळनुरे यांच्या स्वाक्ष-या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या