कातकरवाडी व पिंपळदरी येथे आमदार स्थानिक विकास निधी मधून तर बडवणी ते कातकरवाडी रस्त्याचा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून होनार विकास .
आ. गुट्टे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन
गंगाखेड प्रतिनिधी तुषार उपाध्याय
गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या स्थानिक विकास निधीमधून गंगाखेड तालुक्यातील कातकरवाडी व पिंपळदरी येथे सभामंडप बांधकाम करण्यात येणार असून बडवणी ते कातकरवाडी या १.३५० किमी रस्त्याचा विकास मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून होणार असून या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मौजे बडवणी ते कातकरवाडी या १.३५० कि.मी. रस्ता सुधार कामाकरिता ९०.३२ लक्ष रुपयांतून रस्त्यांचा विकास व आमदार स्थानिक विकास निधी मधून मौजे कातकरवाडी येथे ११ लक्ष व पिंपळदरी येथे १२ लक्ष रुपयाच्या निधीतून सभामंडप बांधकाम करण्यात येणार आहे. बडवणी ते कातकरवाडी या रस्त्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असल्याने या गावच्या नागरिकांचे अतोनात हाल होत होते. आमदार गुट्टे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून या भागातील लोकांचा रस्त्याचा प्रश्न यांचा सूटणार आहे.
मौजे कातकरवाडी भूमिपूजन सोहळा याप्रसंगी सभापती मुंजाराम मुंडे, गंगाखेड तालुका प्रभारी हनुमंत मुंडे, गंगाखेड तालुका अध्यक्ष शिवाजी पवार, संभुदेव मुंडे यांच्यासह मौजे कातकरवाडी येथील ग्रामस्थ तर पिंपळदरी येथील सभामंडपाच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी व जि.प.स. किशनराव भोसले, प्रभारी हनुमंत मुंडे, पिंपळदरी चे सरपंच पंडितराव मुंडे, गोविंद फड, तालुका अध्यक्ष शिवाजी पवार, बडवणी चे सरपंच संभूदेव मुंडे, सरपंच खांडेकर,सरपंच कृष्णा मुंडे, सरपंच आटके ,सोमनाथ मुटकुळे,धारबा हाके, व पिंपळदरी, बडवणी, कातकरवाडी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मतदार संघात अशा प्रकारचे कामे होत असल्याने गंगाखेड मतदार संघ हा विकासाच्या दिशेने वाट चाल करत असल्याचे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

0 टिप्पण्या