वीज जोडणी बाबत गावात बैठक घ्या;-राणा दादा

 वीज जोडणी बाबत गावात बैठक घ्या;-राणा दादा


परंडा प्रतिनिधी-विजय शेवाळे


महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांची वीज तोडत आहे, ही बाब आजच्या परिस्थितीत अत्यंत अन्यायकारक आहे व ती तातडीने थांबवा अशी मागणी भारतीय जनता पार्टीने केली होती. 


जिल्ह्यातील व राज्य स्तरावरील अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली असता त्यांनी याबाबत असमर्थता दर्शविली. ऊर्जामंत्री साधे फोनवरही उपलब्ध होत नाहीत. अशा परिस्थितीत आता प्रत्येक गावात या विषयावर बैठक घेणे आवश्यक ठरले आहे. ऑडिओब्रीज कॉलच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे सर्व बुथ प्रमुख, केंद्रप्रमुख तथा नेत्यांना अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 


हा विषय एका राजकीय पक्षाचा नसून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे सर्व बाधित शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येते की, या निर्णयाबाबत आपली भूमिका मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविण्यासाठी बैठक घेऊन त्यांच्या नावाने निवेदन तयार करून शेतकऱ्यांच्या स्वाक्षर्‍या घ्याव्या. तसेच आंदोलनाचे स्वरूप ठरविण्यात येत आहे व त्याबाबत आपल्याला अवगत केले जाईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या