पेठ शिवणी येथे "भव्य सत्कार सोहळा कार्यक्रमाचे 'आयोजन
पालम प्रतिनिधी
पेठ शिवणी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुरी प्रक्रियेत ज्या ज्या व्यक्तीचा प्रत्यक्ष सहभाग होता अशा व्यक्तीचा *"सत्कार -सन्मान सोहळा'* व covid-19 मध्ये कार्य केलेल्या आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी- मदतनीस ताई ,आशा वर्कर आदीचा *"कोव्हिड योद्धा* 'म्हणून सन्मान करण्यात येणार आहे. तसेच *सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य केलेल्या काही मंडळीचा सत्कार करण्यात आला.* या कार्यक्रमात सन 2009 ते 2021 या कालावधीतील संबंधित *अधिकारी-कर्मचारी नागरिक, पत्रकार* आदी मंडळीचा समावेश करण्यात आला. *सदरील कार्यक्रमासाठी परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजेश दादा विटेकर साहेब, परभणी जिल्हा परिषदेचे गटनेते तथा पिक विमा चळवळीचे डॉ. सुभाष कदम साहेब ,परभणी जिल्ह्यात मदतीचा हात म्हणून परिचित असलेले संतोष भाऊ मुरकुटे, जेष्ठ अभियंता काशिनाथ शेटे सर, भाऊराव मेहत्रे सर आदी प्रमुख पाहुणे * व्यासपीठावर उपस्थित होते .तरी या कार्यक्रमाला पेठशिवणी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजक भगवान करंजे (पत्रकार) स्वप्नपूर्ती परिवार* यांच्या वतीने करण्यात आले होते. या *कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपीनाथ शिनगारे सर यांनी केले तर प्रास्ताविक मन्मथ बरडे सर यांनी केले.*

0 टिप्पण्या