काँग्रेस पक्षाच्या माध्यमातुन आगामी बरबडा जिल्हा परिषद निवडणुकीत डॉ बी एस ढगे इच्छुक - नायगाव रुई प्रतिनिधी माधव पवार न

 काँग्रेस पक्षाच्या माध्यमातुन आगामी बरबडा जिल्हा परिषद निवडणुकीत डॉ बी एस ढगे इच्छुक - ना

रुई प्रतिनिधी माधव पवार 

राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री व नायगाव विधानसभा मतदार संघांचे विद्यमान माजी आमदार तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांच्या माध्यमातुन आगामी बरबडा जिल्हा परिषद गटाची निवडणुक लढविणार असल्याचे डॉ बी एस ढगे वजीरगावकर यांचे संकेत असल्यामुळे काँग्रेस पक्ष श्रेष्ठीने जर निवडणूक लढविण्याची संधी दिल्यास बरबडा सर्कलच्या विकासासाठी प्राधान्य देऊ असे ही डॉ ढगे यांनी या परिसरात सोयरपणाचे जाळे असल्याचे ही सांगितले आहे

नायगाव तालुक्यातील बरबडा जिल्हा परिषद गटात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागल्यामुळे या सर्कल मध्ये राजकीय वर्तुळात व जनतेत निवडणुकीची चर्चा चांगलीच रंगू लागली असल्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण व माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी बरबडा जिल्हा परिषद गटाचे जर आरक्षण सर्व साधारण पुरुषासाठी सुटले तर या गटातील निवडणूक लढविण्यासाठी संधी द्यावी असे डॉ बी एस ढगे वजीरगावकर यांनी सांगितले आहे

तालुक्यातील वजीरगाव येथील रहिवासी असलेले डॉ बी एस ढगे हे गेल्या विस ते एकविस वर्षा पासून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या विचाराने पक्ष बळाकटीसाठी काम केले असल्यामुळे व गावांत ही गेल्या १५ वर्षा पासून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातुन पार्टी प्रमुख म्हणून ग्रामपंचायतच्या निवडणुका लढविण्यात आल्या आहेत राजकीय वर्तुळासह जनसामान्य माणसाचा चांगला जनसंपर्क असल्यामुळे बरबडा सर्कलचा विकास करण्यासाठी येत्या आगामी जिल्हा परिषद बरबडा गटात निवडणूक लढविण्याची संधी प्राप्त झाल्यास नक्की इच्छुक असल्याचे डॉ बी एस ढगे यांनी सांगितले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या