हुस्सा येथील महिलेचे कान तोडून दोघांनी वाईट हेतूने हाताला धरलं,बाईन केली तक्रार लगेच पोलीसांनी दोघाला घेरल, कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नायगाव रुई प्रतिनिधी माधव पवार
नायगाव तालुक्यातील हुस्सा हे गाव कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते असाच एक गंभीर प्रकार हुस्सा येथे दिनांक १ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास एका महिलेस शेतातून ट्रॅक्टर नेण्याच्या कारणावरून गावातील रहिवाशी असलेले दोघेजण सदर महिलेला अश्लील शिवीगाळ करून तिचा वाईट हेतून हात ओढून मारहाण करीत असताना सदरील महिलेचे डाव्या बाजूचे कान तुटल्याने तिला प्रथम उपचारासाठी नायगावच्या ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आला आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मौजे हुस्सा येथील महिलेचें कान तुटल्यामुळे सर्जरी करण्यासाठी नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु डॉक्टरानी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवून देण्यात दिले असून या प्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी हुस्सा येथील दोन आरोपीच्या विरोधात दिनांक २ नोव्हेंबर २०२१ रोजी गुन्हा दाखल केला आहे.
कुंटूर पोलीस ठाण्याच्या हादीतील हुस्सा हे गाव कुंटूर पोलीस ठाण्यापासून ५ ते ७ किलोमीटर अंतरावर असून हे गाव अनेक बाबीतून चर्चेला येत असते परंतु हुस्सा येथिल राहिवासी असलेल्या शशीकलाबाई रघुनाथ तेलंगे वय ५० वर्ष ही महिला तिच्या नातेवाईकाच्या खंड केलेल्या शेतात केर-कचरा वेचत असताना सदरच्या शेतातून आरोपी रामेश्वर हंबर्डे व ऊनकेश्वर हंबर्डे या दोघांनी संगणमत करून महिलेला बेदम मारहाण करीत असताना झालेल्या झटापटीत त्या कान तोडले व तिचा वाईट हेतूने हात धरून ओढल्यामुळे प्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात तत्काळ फिर्यादी बाईने केली तक्रार, गुन्हा दाखल .
कुंटूर पोलीस ठाण्याचें सपोनि महादेव पुरी यांची हुस्सा येथील घटने प्रकरणी परीट धोबी समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास तेलंग टेभुर्णीकर यांच्यासह जिल्हाध्यक्ष गंगाधर माऊली यांनी सपोनि.पुरी यांची भेट घेऊन सदर घटनेची माहिती सांगितली सदरील घटनेच्या संदर्भात पुरी यांनी सदर महिलेची तक्रार व दखल घेऊन हुस्साचें दोन आरोपी रामेश्वर हंबर्डे व ऊनकेश्वर हंबर्डे यांच्या विरोधात शेषीकलाबाई रघुनाथ तेलंगे यांच्या फिर्यादी वरून गुन्हा नंबर २२७ /
२०२१ कलम ३५४,३२४,३२३,२९४,५०४ ५०६,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोहेका बालाजी मुंगडे, व पोलीस नाईक भार्गव सुवर्णकार यांनी दिली असून सपोनि पुरी यांच्या आदेशानुसार फौजदार दिनेश येवले हे पुढील करीत आहे

0 टिप्पण्या