नाव नावाजल अन् नऊ गावाला गेल, गंगाखेड येथील रस्त्या बाबत असच झाल.
गंगाखेड प्रतिनिधी तुषार उपाध्याय
महाराष्ट्र हि संताची भुमी असली तरी, गंगाखेड ही, संत जनाबाई याची पावन जन्मभुमी आहे. आणि त्यात गंगाखेड तालुक्याचं ठिकाण असुन,साठ ते सत्तर खेडेगावाच मुख्य व मोठे मार्केट आहे.
परभणी जिल्ह्यातील व्यावसायिक क्षेत्रात नंबर एकचा तालुका म्हणून गंगाखेडची गणना केली जाते,
आशा नावाजलेल्या गंगाखेड शहरातील अंतर्गत व बाह्य रस्त्याची अवस्था एवढी वाईट झाली आहे की, वाहन चालवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. राजकीय पुढाऱ्यांनी स्वार्थ साधु धोरण अवलंबिले असल्याने, प्रशासन निष्क्रिय झाले आहे, गंगाखेड तालुक्यात रस्ते विकासासाठी विचार करणार कोणी आहे का, का फक्त पदासाठी मताची भिक मागे पुढारीच आहेत, अशी दबक्या आवाजात प्रवासी व आम जनता चर्चा करत असल्याचे दिसून येत आहे.

0 टिप्पण्या