आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा वेध कार्यकर्त्याच्या अपेक्षा आणि बरबडा गटात गांजलेल्या रस्त्याच्या समस्या

 आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा वेध कार्यकर्त्याच्या अपेक्षा आणि बरबडा गटात गांजलेल्या रस्त्याच्या समस्या 

-नायगाव रुई प्रतिनिधी माधव पवार 

राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर करण्यापूर्वीच निवडणुका कोणत्याही असो लोकसभेच्या असो की विधानसभेच्या असो अथवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असो सर्वच राजकीय पक्षाच्या नेते मंडळीपेक्षा ही ग्रामीण भागातील ज्या ज्या पक्षांचे कार्यकर्ते असतात त्यांना चांगलीच निवडणुकीची उत्सुकता असतें परंतु आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असल्यामुळे बरबडा जिल्हा परिषद गटात निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत

नायगाव तालुक्यातील जिल्हा परिषद बरबडा गटात राजकीय पुढाऱ्याच्या बेजबाबदारपणामुळे रस्त्याच्या अनेक समस्या वाढल्या आहेत जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या तालुक्यातील बरबडा जिल्हा परिषद गटात सर्वच पक्षाचे नेते मंडळी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष शरद चंद्रजी पवार यांच्यासह राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपाचे विरोधी पक्ष नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा पक्षातील निष्ठावंत काम अनेक वर्षापासून करत असलेल्या कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची चांगलीच चाहूल लागली असला तरी जिल्हा परिषद गटाकडे कोणत्याच राजकीय पक्षांच्या पुढाऱ्याचे लक्ष नसल्यामुळे बरबडा जिल्हा परिषद गट अनेक समस्या पासून आता पर्यंत वंचित राहिला आहे

तालुक्यातील बरबडा जिल्हा परिषद गटात जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा नायगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली श्रीनिवास पाटील चव्हाण, बालाजी मदेवाड, मनोज पाटील  मोरे टाकळीकर, प्रकाश पाटील शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वसंत पाटील सुगावे आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाधर बडूरे बडेकर राज्याचे भाजपचे विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या सूचनेनुसार दिलीपराव धर्माधिकारी अथवा सौ छायाताई धर्माधिकारी व प्रहार पक्षाच्या माध्यमांमधून विजयाताई काचावार असल्याचे वास्तव चित्र बरबडा सर्कल मधील असू शकतात असे दिसते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या