आता रेशन दुकानात धान्याशिवाय मिळणार साबण, शाम्पू आणि बरंच काही...

 आता रेशन दुकानात धान्याशिवाय मिळणार साबण, शाम्पू आणि बरंच काही...

परंडा प्रतिनिधी- विजय शेवाळे

आजवर रेशन दुकानातून गहू, तांदूळ, तेल आणि साखर हे मिळत असत मात्र यापुढे स्वस्त धान्य दुकानातून ग्राहकांना चहा, कॉफी, साबण, हॅण्डवॉश, वॉशिंग पावडर आणि शाम्पूही मिळणार आहे. 

राज्यातील ५२ हजार दुकानदारांना या वस्तूंची विक्री करण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिले आहेत.

या वस्तू दुकानदारांनी स्थानिक पातळीवर स्वत: खरेदी करायच्या आहेत. त्याकरिता थेट कंपनीशी दुकानदारांनीच बोलायचे आहे. बाजार दरानुसार या वस्तू स्वस्त धान्य दुकानातून विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे.

ही परवानगी अस्थायी स्वरूपात देण्यात आली आहे. यातून मिळणाऱ्या नफ्यावर शासनाचा हस्तक्षेप राहणार नाही. हा नफा थेट विक्रेत्यांना घेण्याची मुभा अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिली आहे.

विक्रेत्यांनी दिला बंदचा इशारा रेशन दुकानदारांना मिळणारे कमिशन परवडणारे नाही. ते दिल्ली आणि तामिळनाडूप्रमाणे मिळावे, अशी मागणी राज्यातील दुकानदारांची आहे. कमिशन वाढवून द्यावे आणि मोफत धान्य वितरणातील मूळ रक्कम आणि कमिशन अदा करावे, यासाठी १ डिसेंबरपासून रेशन दुकानदार संप करणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या