क्रांतिवीर भाई कोतवाल नाभिक सेवा संघाच्या वतीने एस. टी. कर्मचारी संपाला जाहीर पाठिंबा

 क्रांतिवीर भाई कोतवाल नाभिक सेवा संघाच्या वतीने एस. टी. कर्मचारी संपाला जाहीर पाठिंबा

जालना प्रतीनीधी :- मागील 3 ते 4 आठवड्यापासू न्याय हक्क मागणी करिता बेमुदत संप सुरू आहे. अनेक कर्मचार्यांनी टोकाची भूमिका घेऊन आत्महत्या केल्या आहेत. यावर आजपर्यंत काहीच निष्पन्न झाले नाही. एस. टी. महामंडळ हे सर्वसामान्य जनतेच्या प्रवासासाठी प्रमुख साधन आहे. या संपामुळे प्रवाशांचे दयनीय अवस्था झाली आहे.

      एस. टी. महामंडळ मधील कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून शासनाने तात्काळ मंजूर करावे. एस. टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्या वेतन वाढवणे, पेन्शन वाढ, महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करणे, आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांना त्यांच्या जागेवर सेवेत समाविष्ट करून घेऊन सहकार्य करावे. खाजगी प्रवासी वाहतुकदारांकडून होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी.

     या कारणास्तव क्रांतिवीर भाई कोतवाल नाभिक सेवा संघ महाराष्ट्र कडून पाठींबा देत आहोत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या