वीज तोडणी करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ : शेतकऱ्यांची वीज तोडणे त्वरित थांबवा;-राणा दादा

 वीज तोडणी करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ : शेतकऱ्यांची वीज तोडणे त्वरित थांबवा;-राणा दादा

परंडा प्रतिनिधी-विजय शेवाळे

अतिवृष्टीने पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असताना वीज बिलापोटी सरसकट वीजपुरवठा बंद करून महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. 

एकीकडे तुटपुंजी मदत करून शेतकऱ्यांचा कळवळा दाखवायचा तर दुसरीकडे सक्तीची वीज वसुली सुरू करून या हाताने दिलेले त्या हाताने व्याजासकट वसूल करण्याचा गोरखधंदा सरकारने सुरू केला आहे. 

रब्बी हंगामात वीज पुरवठा खंडित करून शेतकऱ्यांना खिंडीत गाठण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करत असून शेतकर्‍यांच्या संयमाचा आता अंत झाला आहे. त्यांच्या आक्रोशाचा विस्फोट होण्याअगोदर सक्तीची वीज बिल वसुली बंद करून कृषी पंपांचा तोडलेला वीजपुरवठा पुर्ववत करण्याचे आदेश तत्परतेने व्हावेत. अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या