नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरबडावाडी येथील एका गटाच्या ९ जणावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा तर दुसर्या एका गटाच्या एका व्यक्तीवर ३५३ दाखल
नायगाव रुई प्रतिनिधी माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मौजे बळेगाव येथील ॲट्रॉसिटीचे प्रकरण चालू असताना बरबडावाडी येथील रहिवासी असलेल्या एका गटाच्या ९ लोकावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ॲट्रॉसिटी होण्याची ही आठवड्यातील दुसरी घटना असल्यामुळे सदरची घटना दिनांक २५ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी साडे आठ वाजण्याच्या दरम्यान घडली असून यातील आरोपी रामदास किसन हासेवाड यांनी गैर कायद्याची मंडळी जमून राजेश्वर गणपती दूधंबे यांना जातीवाचक शिवीगाळ करून काठीने व दगडाने माराहण केल्या प्रकरणी बरबडा वाडीच्यानऊ जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल कुंटूर पोलीस ठाण्यात करण्यात आला तर दुसऱ्या घटनेतील एका गटाच्या एकावर ३५३ भोकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रांजनगावकर यांच्या आदेशानुसार ठाण्याचे सपोनि महादेव यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल करण्यात आल्याची माहिती ठाणे अंमलदार बालाजी मुंगडे यांनी दिली आहे
तालुक्यातील कुंटूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्याबरबडावाडी येथे दुसर्या घटनेत २९ वर्षीय महिला आपल्या वडिलांच्या शेतात हरभऱ्याची हिरवी भाजी खुडत असताना महिला एकटी असल्याचे पाहून आरोपी राजेश्वर गणपती दूधंबे यांनी हरभऱ्याची हिरवी भाजी खूडत असलेल्या महिलेच्या पाठीमागून जाऊन तिचा वाईट हेतूने हाताला व मांडीला धरून ओढून घेऊन जात असताना त्या महिलेने आरडा ओरडा केल्याने फिर्यादी महिला गंगुबाई दिलीपराव तेलंगे राहणार कापसी तालुका लोहा हल्ली मुक्काम बरबडावाडी येथील वडिलांच्या शेतात घडत असलेला प्रकार पाहून तिचे दोन भाऊ रामदास किशन हासेवाड आणि बळीराम किशन हासेवाड या दोघानी धावून आले व सदरील घडलेल्या घटनेत घडलेला प्रकार आरोपी राजेश्वर गणपती दूधंबे यांना विचारणा केली असता आरोपीने दोघाला ही जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार महिलेने ठाण्यात दिली आहे
कुंटूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या ॲट्रॉसिटी प्रकरणातील आरोपी रामदास किसन हासेवाड,मारुती राजाराम हासेवाड,वैभव रामदास हासेवाड,अंकुश राजाराम हासेवाड,बळीराम किसन हासेवाड,किसन मारोती हासेवाड,सिताराम मारोती हासेवाड,रोहिदास सिताराम हासेवाड,राजाराम मारोती हासेवाड,सर्व राहणार बरबडावाडी यांनी या घटनेतील फिर्यादी राजेश्वर गणपती दुधंबे, गणपती विठोबा दुधंबे, बालाजी गणपती दुधंबे यांना ॲट्रॉसिटीतील पाच आरोपीने मांडीवर, कमरेवर, उजव्या खांद्यावर, हातावर, दंडावर, काठीने मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकाच्या विरोधात तक्रार केल्यामुळे परस्पर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची संपूर्ण माहिती सपोनि महादेव परी यांचे रॉयटर शंकर बुद्धेवाड, पोहेका मुगंडे दिली व ॲट्रॉसिटी प्रकरणाचा पुढील तपास भोकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रांजनगावकर करीत आहेत ३५३ गुन्हाचा तपास बिट जेमादार निकाते हे करीत आहेत

0 टिप्पण्या