शेल्हाळ नगरीस मिळणार भोपणी डॅम चे पाणी
गुडसुर प्रतिनिधी देमगुंडे जयराम
गुडसुर. आज दिनांक 09-11-2021 रोजी शेल्हाळ नगरीचे तरूण तडफदार सरपंच श्री मनोज भाऊ चिकले यांच्या अथक प्रयत्नातून भोपणी डॅम चे पाणी शेल्हाळला मिळणार आहे .
आज या डॅमची पाहणी करण्यासाठी भुवैज्ञानिक व पाणीपुरवठा अधिकारी श्री नागरगोजे साहेब लातूर यांनी पाहणी केली .
यांच्या सोबत सरपंच श्री मनोज भाऊ चिकले , श्री नागरगोजे साहेब , बामणी गावचे सरपंच व उपसरपंच दोन्ही गावचे नागरीक उपस्थित होते .
बामणी ग्रामपंचायत यांच्या वतीने श्री मनोज भाऊ चिकले व श्री नागरगोजे साहेबांचा यथोचित सत्कार करण्यात आला .

0 टिप्पण्या