रगेल अधिकारी चढेल भाषा,बदली झाली तरी गुंडाळून जाईना गाशा म्हणून गावकऱ्यांनी केली वरपूडकर यांच्याकडे तक्रार
पालम प्रतिनिधी : तालुक्यातील सिरपूर सोसायटीच्या गट सचिवांची तक्रार जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश वरपुडकर केली आहे. त्यात बदली होऊनही सिरपूर येथील सोसायटीचा पदभार सचिव सुजय कांबळे यांनी सोडलेला नाही. तो लवकर सोडण्याचे आदेश द्यावे, अन्यथ बेमुदत उपोषणाचा इशारा 1 नोव्हेंबर रोजी निवेदनात दिला आहे.
ऑगस्ट 2021 मध्ये सिरपूरचे सचिव सुजय कांबळे यांची बदली पूर्णा तालुक्यातील धनोरा मक्ता तेथे झाली आहे. तरीही सिरपूर सोसायटीचे दप्तर नव्याने बदलीवर आलेल्या सचिव पावर यांच्याकडे सादर केलेला नाही. त्याची तक्रार पवार यांनी पालम तालुका सहाय्यक निबंधकाकडे केली होती. त्यावर निबंधकांनी कांबळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्याला देखील उत्तर कांबळे यांनी दिलेले नाही. म्हणजेच प्रशासनाच्या आदेशाला कांबळे यांनी केराची टोपली दाखवली. ते कोणाचेही आदेश मानण्यास तयार नाहीत. म्हणून त्यांची बदली तातडीने करण्यात यावी, अन्यथा बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. निवेदनावर माजी सरपंच सुधाकर हानवते, राहुल आवरगंड, बालाजी लांडे, उपसरपंच सदाशिव लांडे,
लांडे, गजानन दुधाटे, दत्तराव आवरगंड, सुरेश लांडे, विष्णू आवरगंड, माणिकराव लांडे यांच्या स्वाक्षऱ्या निवेदनावर आहेत.

0 टिप्पण्या