AYR Multipurpose फाउंडेशन मार्फत डॉ ऐश्वरी राठोड यांनी केली सामान्य कुटुंबा सोबत दिवाळी साजरी
जळगाव जिल्हा प्रतिनिधी
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या साने गुरुजींच्या कवितेतील ओळी आठवतात, जेव्हा जेव्हा डॉ ऐश्वरी राठोड कार्य करतात.
डॉ ऐश्वरी राठोड यांनी दर वर्षी प्रमाणे यंदाही, दिवाळी मध्ये गरजूंना फराळ, फटाके, काही ठिकाणी आरोग्य शिबिरे, विविध वस्त्रांचे वाटप व साड्यांचे वाटप अशा प्रकारे विविध उपक्रम राबविले,
जगी जे दीन पद दलीत तया जाऊन उठवावे,या उक्ती प्रमाणे, गेल्या कित्येक वर्षापासून, जामनेर तालुक्यामध्ये वाघरी बेटावद, जिल्हा परिषद गटांमध्ये, अनेक प्रकारचे उत्कृष्ट दिवाळी निमित्त अभियान राबविले,
या वर्षीसुद्धा फटाके ,मिठाई ,फराळ वाटून डॉ.ऐश्वर्री राठोड यांनी साजरी केली. त्यांच्या AYR Multipurpose फाउंडेशन मार्फत, प्रत्येक सामान्य कुटुंबात पर्यंत पोहोचून, सामान्यांच्या दुःखामध्ये सहभागी होऊन, दिवाळी साजरी करण्याचा आगळा वेगळा आनंद घेतला.
डॉ ऐश्वर्री राठोड. महिला जिल्हाध्यक्ष सेवादल. भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टी. तालुका. जामनेर .जिल्हा. जळगाव.या त्यांच्या कार्याबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

0 टिप्पण्या