आमदार गुट्टे यांनी कृषी मंत्र्यांची भेट घेऊन परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2020 चा थकीत पिक विमा देण्याची केली मागणी

 आमदार गुट्टे यांनी कृषी मंत्र्यांची भेट घेऊन परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2020 चा थकीत पिक विमा देण्याची केली मागणी

गंगाखेड प्रतिनिधी तुषार उपाध्याय

        गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी आज मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री मा.ना. दादा भुसे यांची भेट घेऊन परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२० चा थकीत पीक विमा देण्याची मागणी केली.

          परभणी जिल्ह्यातील सोनपेठ, गंगाखेड व पालम तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप २०२० चा सोयाबीन व तूर या पिकांचा मंजूर असलेला पिक विमा अद्याप मिळाला नसल्याने शेतकऱ्यावर हा एक प्रकारचा अन्यायच म्हणावा लागेल. जगाचा पोशिंदा म्हणणाऱ्या बळीराजाला त्याच्या हक्काच्या पीक विम्यापासून वंचित ठेवने कितपत योग्य आहे ? असा प्रश्नही आ.गुट्टे यांनी या पत्रातून उपस्थित केला.

        गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी मंडळातील ६४९७.१४ हे. क्षेत्राकरीता १३ कोटी ३८ लाख ४४ हजार ८६२ रुपये व सोनपेठ तालुक्यातील शेळगाव मंडळातील ३११७.७५ हे. क्षेत्राकरीता ६ कोटी ५८ हजार ८१५ रुपयांचा सोयाबीन या पिकांचा मंजूर असलेला पिक विमा आणि गंगाखेड तालुक्यातील ४३२४.७८ हे. क्षेत्राकरीता ११ कोटी ५१ लाख ९९ हजार २०१ रुपयांचा पिक विमा व पालम तालुक्यातील ६४६६.६ हे. क्षेत्राकरीता १८ कोटी ७७ लाख ७८ हजार ९२३ रुपयांचा तूर या पिकाचा मंजूर असलेला पिक विमा अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेला नाही. सोयाबीन व तुर या पिकांचा एकूण ५० कोटी २६ लाख २३ हजार ८०४ रुपयांचा मंजूर असलेला पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करण्यात यावा अशी मागणी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या