केंद्रीयमंत्री नितींजी गडकरी यांची आ.डॉ.रत्नाकररावजी गुट्टे यांनी घेतली भेट.

 केंद्रीयमंत्री नितींजी गडकरी यांची आ.डॉ.रत्नाकररावजी गुट्टे यांनी घेतली भेट.

 गंगाखेड प्रतिनिधी तुषार उपाध्याय

          आज दि : ३१ ऑक्टोबर रोजी गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय आमदार डॉ. रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री मा.नितीनजी गडकरी साहेब यांची नागपूर येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी केंद्रीय निधी अंतर्गत मंजूर रस्त्यांच्या व मोठ्या फुलांच्या कामास निधी उपलब्ध करून लवकर टेंडर लावून रस्त्याच्या व मोठ्या फुलांच्या कामास सुरुवात करावी अशी मागणी करण्यात आली. 

यामध्ये १} गंगाखेड - परळी मंजूर रस्त्याच्या कामाची सुरुवात दत्त मंदिर गंगाखेड येथून सुरुवात करण्यात यावी.

२} गंगाखेड-पिंपळदरी मार्गे किनगाव मंजूर रस्त्याचे टेंडर तात्काळ लावण्यात यावे.

३} गंगाखेड-लोहा महामार्गाच्या कामास लवकर निधी उपलब्ध करून टेंडर लवकर लावण्यात यावे.

४} गंगाखेड मतदार संघातील मोठ्या मुलांचे कामे लवकर मंजूर करण्यात यावेत.

अशा प्रकारच्या मागण्या आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी मंत्रीमहोदय यांच्याकडे केल्या सदर रस्त्याचे व मोठ्या पुलाचे काम लवकर सुरू झाल्यास मतदार संघातील शेती-उद्योग दळणवळना खाली येऊन मतदार संघाचा फायदा होईल.सदरच्या मागणीचे मंत्रीमहोदयांनी लवकरच मागण्या व निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासित केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या