कुंटूर पोलिसांच्या धाडसी कार्यवाहीत बरबडा येथे देशी दारूचे २४ बॉक्स पकडले आरोपी ताब्यात -

 कुंटूर पोलिसांच्या धाडसी कार्यवाहीत बरबडा येथे देशी दारूचे २४ बॉक्स पकडले आरोपी ताब्यात -


- नायगाव रुई प्रतिनिधी माधव पवार 


नायागांव तालुक्यातील कुंटूर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मौजे बरबडा येथे समाज मंदिर नवीन वसाहातीत अवैध रित्या देशी दारूचे एकूण २४ चोरट्या मार्गाने पोलिसाच्या नजरा चुकून विक्री करणाऱ्या देशी दारूचे बॉक्स बाळगत असलेल्या व्यक्तीची गोपनीय माहिती बिलोली आयपीएस आरचित चांडक यांना मिळाल्या वरून कुंटूर पोलिस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांनी दिनांक २४ ऑक्टोबर २०२१ रोजी संध्याकाळी ठीक ८ ते ९ वाजन्याच्या दरम्यान धाडसी कार्यवाहीत एकूण देशी दारूचे २४ बॉक्स पकडले असून त्यांची अंदाजी किंमत ६९ हजार ते ७० हजार रुपये असल्याची माहिती सपोनि पुरी यांनी दिली आहे


तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांनी बिलोलीचे आयपीएस चांडक यांच्या आदेशानुसार ठाण्याचे फौजदार संजय आटकोरे यांच्या रुई बु बिटचे जेमादार कुमरे, पोलिस नाईक कंदारे, रामेश्वर पाटील पोलिस जीप चालक यांनी देशी दारूच्या २४ बॉक्ससह एका आरोपीला ताब्यात घेतले याच बरबडा येथे दुसऱ्या एका धाडीत साईराज हॉटेल मध्ये एका आरोपी कडून दहा दारूच्या बॉटल जप्त करण्यात आले असून  सदरची धाडसी कार्यवाही झाली असल्यामुळे बिलोलीचे आयपीएस यांनी कुंटूर येथे येणार असल्याचे सपोनि  महादेव पुरी यांनी सांगितले असून असीच देशी दारूची कार्यवाही तीन ते चार वर्षाखाली टोलनाक्या जवळ झाली होती सदर प्रकरणातील आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कुंटूर ठाण्यात चालू असल्याचे पोलीसानी सांगितले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या